शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विजेसाठी महाराष्ट्र खासगी यंत्रणा आणि केंद्राच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:05 IST

ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र प्रत्यक्षात मात्र खासगी कंपन्या आणि केंद्राकडून होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळेच विजेच्या टंचाईच्या दिवसात निभावून नेत आहे.

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र प्रत्यक्षात मात्र खासगी कंपन्या आणि केंद्राकडून होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळेच विजेच्या टंचाईच्या दिवसात निभावून नेत आहे. राज्यात सध्या १७ हजार मेगावॅटपेक्षा अधिक विजेची मागणी आहे. मात्र सरकारी कंपनी महाजनकोच्या संयत्रांमधून केवळ ४,७३५ मेगावॅट वीज मिळते. उर्वारित वीज खासगी कंपन्या आणि केंद्रासोबतच पॉवर एक्सचेंजमधूनही घेतली जात आहे, या आकडेवारीवरून परिस्थतीचा अंदाज लावला जात आहे.१३ मेच्या दुपारची विजेची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती लक्षात घेतली तर, राज्यात एकूण १७,५७६ मेगावॅट विजेची मागणी होती. लॉकडाऊनच्या काळात औद्योगिक कंपन्या सुरू झाल्याने मागणीतही रोज वाढ दिसत आहे. महाजनकोने या दरम्यान १०,४२२ मेगावॅट (हायड्रो पॉवर वगळता) या स्थापित क्षमतेच्या ऐवजी ४,७३५ मेगावॅॅटचे उत्पादन केले. महावितरणने ही मागणी पूर्ण केली. परंतु यात ३,५८८ मेगावॅटचे योगदान खासगी संयंत्रांचे होते. केंद्र सरकारची कंपनी एनटीपीसीने ३,५८८ मेगावॅटचे योगदान दिले. एनटीपीसीचे महाराष्ट्रातील मौदा आणि सोलापूर येथील संयंत्र ठप्प पडल्यावर हे घडले. प्रत्यक्षात या दरम्यान हायड्रो पॉवरने १,४०९ मेगावॅट वीज दिली होती. यात कोयना प्रकल्पाचे योगदान १,२२८ मेगावॅट होते. मात्र रात्रीतूनच हा आकडा २३२ खाली घसरला. त्याचप्रमाणे १,७०० मेगावॅट पॉवर एक्सचेंजकडून तसेच ८२० मेगावॅट वीज अन्य स्रोतांकडून घेण्यात आली होती.३ केंद्रे व १२ युनिट्स बंदतिकडे महाजनकोची तीन औष्णिक केंदे्र ठप्प पडली आहेत. यात कोराडी, नाशिक आणि भुसावळ केंद्रांचा समावेश आहे. या सोबतच एकूण १२ वीज युनिट बंद पडले आहेत. महाजनकोच्या मते लॉकडाऊनमध्ये विजेची मागणी मंदावली होती. यामुळे महागडी संयंत्रे बंद केली होती. मागणी वाढल्याने आता ती सुरू केली जातील. दुसरीकडे महावितरणने खासगी संयंत्रांची वीज स्वस्त असल्याचा दावा केला आहे. त्यांची वीज खरेदी न केल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे महाजनकोच्या विजेचा वापर कमी होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :electricityवीज