Maharashtra Nagar Parishad Election Result: पती-पत्नीने एकाच वेळी बनले नगरसेवक ! वाडी नगरपरिषदेवर पती उद्धवसेनेकडून तर पत्नी अपक्ष विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:45 IST2025-12-21T17:42:46+5:302025-12-21T17:45:34+5:30

Nagpur : वाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून सर्व प्रभागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी काही प्रभागांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली

Maharashtra Nagar Parishad Election Result: Husband and wife become corporators at the same time! Husband wins from Ubatha, wife wins as independent in Wadi Municipal Council | Maharashtra Nagar Parishad Election Result: पती-पत्नीने एकाच वेळी बनले नगरसेवक ! वाडी नगरपरिषदेवर पती उद्धवसेनेकडून तर पत्नी अपक्ष विजयी

Maharashtra Nagar Parishad Election Result: Husband and wife become corporators at the same time! Husband wins from Ubatha, wife wins as independent in Wadi Municipal Council

​वाडी  : वाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून सर्व प्रभागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी काही प्रभागांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली, तर काही ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजय नोंदवण्यात आला. नगराध्यक्ष पदी भाजपचे नरेश चरडे यांना १६६०१ एकूण तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रेमनाथ झाडे यांना ५९४२ मते मिळाली नरेश चरडे यांचा १०६५९ मताधिक्याने विजय झाला.

तसेच शहरातील सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीत एक अनोखा आणि चर्चेचा विक्रम नोंदवला गेला आहे. वाडी शहराच्या राजकारणात पहिल्यांदाच पती-पत्नी दोघेही एकाचवेळी नगरसेवक म्हणून निवडून येत जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरले आहेत. या ऐतिहासिक निकालामुळे शहरात राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

प्रभाग क्रमांक ४ (अ) मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उमेदवार हर्षल अनिल काकडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय मिळवला. तर प्रभाग क्रमांक ७ (ब) मधून अपक्ष उमेदवार पूर्वा हर्षल काकडे यांनीही जोरदार कामगिरी करत विजय खेचून आणला. विशेष म्हणजे, दोघांनीही वेगवेगळ्या प्रभागांतून आणि वेगवेगळ्या राजकीय समीकरणांतून निवडणूक लढवत यश संपादन केले आहे.

प्रभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे 

  • प्रभाग क्र. १ : विजयी उमेदवार –१) संगीता गुरुदास बावणे  (भाजप)२) दिलीप दशरथ दोरखंडे  (राष्ट्रवादी शरद पवार)
  • प्रभाग क्र. २ : विजयी उमेदवार – १)_अंकिता कुंदन कापसे( राष्ट्रवादी शरद )२) श्यामभाऊ वसंतराव मंडपे (राष्ट्रवादी शरद पवार)
  • प्रभाग क्र. ३ : विजयी उमेदवार – १)कांचन दिनेश उईके (भाजपा)२) संदीप कृष्णराव चरडे (भाजपा)
  • प्रभाग क्र. ४ : विजयी उमेदवार – १)हर्षल अनिल काकडे (उबाठा)२) कल्पना किशोर सगदेव (भाजपा)
  • प्रभाग क्र. ५ : विजयी उमेदवार –१)ज्योती भीमराव बोरकर( भाजपा )२) आनंद तुळशीराम कदम (भाजपा )
  • प्रभाग क्र. ६ : विजयी उमेदवार – १)केशव सुदामजी बांदरे (भाजपा)२)मनोरमा विश्वेश्वर येवले (भाजपा)
  • प्रभाग क्र. ७ : विजयी उमेदवार – १)_विजय फतन मेंढे (भाजप) २) पूर्वा हर्षल काकडे (अपक्ष)
  • प्रभाग क्र. ८ : विजयी उमेदवार –१) लीलाबाई दिवाणजी रहांगडाले (भाजपा) २) कमल महिपाल कनोजे (भाजपा )
  • प्रभाग क्र. ९ :  विजयी उमेदवार - १) रेखा गोविंद रोडे (भाजपा)२) राजेश शामराव थोराणे( अपक्ष)
  • प्रभाग क्र. १० : विजयी उमेदवार - १)किरण विशाल लांजेवार (भाजपा )२)सरिता निकेश यादव (भाजपा)
  • प्रभाग क्र. ११ : विजयी उमेदवार - १)आशिष मुरलीधर पाटील (काँग्रेस)२)सविता अविनाश ईसळ (भाजपा)
  • प्रभाग क्र. १२ : विजयी उमेदवार - १)दिनेश महेंद्र कोचे (भाजपा)२) सुनीता रामसागर मेश्राम ( वंचित आघाडी)
  • प्रभाग क्र. १३ : विजयी उमेदवार १)राजेश जीवन जंगले (वंचित आघाडी)२) शीतल संदीप नंदागवळी(वंचित आघाडी)३) दिव्या अमोल तिरपुडे (भाजपा)  यांचा समावेश आहे.

 

निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर मतदारांनी कौल दिल्याचे दिसून येत आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी शहरात आनंदोत्सव साजरा केला. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नवीन नगरपरिषदेकडून वाडी शहराच्या विकासासाठी प्रभावी निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

युवक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. या विजयामुळे वाडी नगर परिषदेच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. काकडे दाम्पत्याच्या विजयानंतर समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. राजकीय इतिहासात ‘पती-पत्नी नगरसेवक’ अशी नवी ओळख निर्माण झाल्याने हा निकाल विशेष लक्षवेधी ठरला आहे.

Web Title : वाडी नगर परिषद चुनाव: पति-पत्नी एक साथ बने नगरसेवक!

Web Summary : वाडी में, शिवसेना (UBT) से पति और निर्दलीय पत्नी दोनों ने नगर परिषद चुनाव जीता। बीजेपी के नरेश चरडे अध्यक्ष बने। दंपती की जीत से स्थानीय राजनीति में जश्न और बदलाव आया।

Web Title : Wife and husband win Wadī Nagar Parishad election simultaneously!

Web Summary : In Wadī, a husband from Shiv Sena (UBT) and his wife, contesting independently, both won Nagar Parishad elections. BJP's Naresh Charade secured the president post. Celebrations erupted as the couple's victory reshaped local politics.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.