शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

वैतागलेल्या शेतमालकाकडून मंत्रालय उडवून देण्याचा फोन; प्रशासनाची उडाली होती खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 20:31 IST

पोलिसांकडून उमरेडच्या व्यक्तीची चौकशी

नागपूर : शासनाने अधिग्रहित केलेल्या शेत जमिनी संदर्भातील वादात न्याय मिळत नसल्याची भावना झाल्याने वैतागलेल्या एका शेतजमीन मालकाने थेट मंत्रालय उडवून देण्याचा मुंबईत फोन केला. त्यामुळे रविवारी दुपारपासून राज्यभर खळबळ उडाली आहे. हादरलेल्या पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्तीची चौकशी चालवली आहे. सागर काशीनाथ मांढरे (४०) असे त्याचे नाव असून ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील मंत्रालयात बॉम्ब पेरण्यात आला असून मंत्रालय उडवून देणार असल्याचा फोन कॉल रविवारी दुपारी मुंबईत करण्यात आला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. चौकशीत हा फोन कॉल नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांनी नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी संपर्क साधला. पोलीस अधिक्षक ओला यांनी लगेच आपली यंत्रणा कामी लावली.

उमरेड परिसरातील सागर मांढरे यांना शोधून काढून सायंकाळी त्यांची चौकशी सुरू केली. सूत्रांच्या माहितीनुसार, तो फोन आपणच केल्याचे मांढरे यांनी कबूल केले. त्यामागची पार्श्वभूमी सांगतांना ते म्हणाले की, जिल्ह्यातील उमरेड जवळच्या मकरधोकडा येथे आमची शेतजमीन होती. जी १९९६ मध्ये शासनाने (वेकोली) अधिग्रहित केली. परंतु त्याचा योग्य तो मोबदला मिळाला नाही.

या संबंधाने गेल्या २४ वर्षांपासून ते शासनासोबत पत्रव्यवहार करत आहे.संबंधित अधिकाऱ्यांकडे अपिलही केले. मात्र कुठूनच न्याय मिळत नसल्यामुळे आपल्याला प्रचंड नैराश्य आल्याचे आणि त्यातूनच हा फोन कॉल केल्याचे मांढरे यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते. मांढरे यांच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल मुंबईला कळविण्यात आला असून तेथील अधिकाऱ्यांची एक चमू मांढरे यांची चौकशी करणार असल्याचे समजते.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरPoliceपोलिस