शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"संविधानाच्या बाता मारणाऱ्या राहुल गांधींच्या कार्यक्रमात प्रसार माध्यमांवर बंदी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 19:56 IST

ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे नागपुरात ६ नोव्हेंबरला संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.

नागपूर - अभिव्यक्ती स्वातंत्र आणि प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या कायम बाता मारणारे काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपुरातील कार्यक्रमादरम्यान प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. राहुल गांधींकडून कायम संविधानाची हत्या केली जातेय असा आरोप भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे नागपुरात ६ नोव्हेंबरला संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. या संमेलनात विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी, सामाजिक संघटनांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी या कार्यक्रमात उपस्थितांना संविधानाचा सन्मान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, एकीकडे राहूल गांधी संविधानिक मूल्यांची गोष्ट करत असताना दुसरीकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारणे ही एकप्रकारे संविधानाची हत्याच आहे असा घणाघात भाजपाने केला आहे.

"काँग्रेसचा छुपा चेहरा समोर"

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलवणार असा खोटा प्रचार करण्यात आला होता. आता नागपूरमध्ये होणाऱ्या संविधान सन्मान कार्यक्रमात प्रसार माध्यमांना बंदी घालण्यात आल्याने संविधानाच्या नावाखाली काँग्रेस कुठला वेगळा अजेंडा राबवत आहेत का? असा सवालही प्रविण दरेकरांनी उपस्थित केला आहे. या कार्यक्रमात प्रसार माध्यमांना प्रवेश नाकारून काँग्रेस पुन्हा एकदा संविधानाच्या नावावर खोटा प्रचार करत असल्याचेही दरेकरांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकर