शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

Maharashtra Assembly Election 2019 : भाजप थेट गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? मनीष तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 11:18 PM

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी यांच्या १५० व्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून बराच गदारोळ सुरू आहे. काँग्रेसकडून टीका केली जात आहे. रविशंकर प्रसाद यांनी आज या मुद्यावर काँग्रेसवर टीकाही केली. या टीकेबाबत पत्रकारांनी मनीष तिवारी यांना छेडले असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या लढ्यात कुठलेही योगदान न देणारे आज देशभक्ती शिकवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी खा. तिवारी यांनी भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे सांगितले. भाजपने पाच वर्षांत खरंच चांगले काम केले तर मग ते त्या कामावर मत का मागत नाहीत. त्यांना भावनात्मक मुद्यांची गरज का पडत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.डॉ. मनमोहन सिंग यांच्या १० वर्षांच्या काळात दोन मोठे जागतिक आर्थिक संकट ओढवले होते. परंतु त्याची साधी झळसुद्धा भारताला पोहचू दिली नव्हती. परंतु मोदी यांच्या केवळ पाच वर्षांत कुठलीही जागतिक मंदी नसताना भारताची अर्थव्यवस्था संकटात सापडली. ही मानवनिर्मित आहे. मुळात मोदी सरकारला अर्थव्यवस्था चालवताच येत नाही, अशी टीकाही खा. तिवारी यांनी केली.जनतेचा पैसा बँकेत सुरक्षित नाहीजनतेचा मेहनतीने कमावलेला पैसा आज बँकेत सुरक्षित नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या देशातील नागरिकांचाच पैसा सुरक्षित नाही, तिथे आमची गुंतवणूक सुरक्षित कशी राहील, या विचाराने कुणीही भारतात गुंतवणूक करायला तयार नाही. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांना जनतेने आळा घातला नाही तर देशाची अर्थव्यवस्था इतकी डबघाईस जाईल की मग ती रुळावर येऊ शकणार नाही? अशी भीतीही खा. मनीष तिवारी यांनी वर्तविली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसMediaमाध्यमे