Maharashtra Assembly Election 2019 :रिपब्लिकन पक्ष 'खोरिपा'चा भाजप-सेना युतीला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:40 IST2019-10-12T20:39:49+5:302019-10-12T20:40:54+5:30
रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)तर्फे भाजप-सेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे आणि राष्ट्रीय अतिरिक्त सरचिटणीस आर. पी. भिडे यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांच्या उपस्थितीत शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

Maharashtra Assembly Election 2019 :रिपब्लिकन पक्ष 'खोरिपा'चा भाजप-सेना युतीला पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)तर्फे भाजप-सेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे आणि राष्ट्रीय अतिरिक्त सरचिटणीस आर. पी. भिडे यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांच्या उपस्थितीत शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
राज्यात गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीच्या सरकारने दलित-आदिवासी अल्पसंख्यक समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा फडणवीस यांच्या नेतृत्वाचे सरकार यावे या हेतूने भाजप-सेना महायुतीत आम्ही सहभागी होत असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष भाऊ निरभवने, जीवन बागडे उपस्थित होते. तसेच यावेळी अ.भा. मातंग संघातर्फेही भाजप सेना महायुतीला पाठिंबा जाहीर करण्यात आला.
खोरिपासोबत आमचे जुने संबंध आहेत. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे आमचे संयुक्त उमेदवार राहिले आहेत. त्यांचा प्रचार मी स्वत: केला आहे. उपेंद्र शेंडे हे मोठे नेते आहेत. राज्यभरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांचा फायदा पक्षाला होईल, विशेषत: उत्तर नागपूरची जागा आम्ही आणखी मोठ्या मतांनी जिंकू.
आ. गिरीश व्यास,
प्रदेश प्रवक्ते, भाजपा