Maharashtra Assembly Election 2019: कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राजेंद्र मुळक मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 23:26 IST2019-10-12T23:22:02+5:302019-10-12T23:26:19+5:30
नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभा, पदयात्रांमध्ये सहभागी होऊन त्यांनी विजयाचे अवाहन केले.

Maharashtra Assembly Election 2019: कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राजेंद्र मुळक मैदानात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभा, पदयात्रांमध्ये सहभागी होऊन त्यांनी विजयाचे अवाहन केले.
मुळक यांनी जिल्ह्यात कांद्री येथे पदयात्रा काढली. यावेळी नरेश बर्वे, शिवकुमार यादव, राजेश यादव, गणेश माहोरे, बळवंत पडोळे, बबलु बर्वे, साबीर सिद्दीकी, अमोल प्रसाद, रिता बर्वे, मीना ठाकूर, लता लुंधेरे उपस्थित होत्या. उमरेडमध्ये श्रमिक सहायता लॉनमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी गंगाधर रेवतकर, मधुकर लांजेवार, डॉ. सुनील पलिये, राजेश भेंडे, राजू उरकुडे, जितु गिरडकर, योगिता इटनकर, सुनील मने, धनंजय झाडे, भारती गिरडकर उपस्थित होत्या. उमरेडमधील मकरधोकडा, नांद येथे त्यांनी प्रचारसभा घेतली. सभेला नंदा नारनवरे, सोपान दडवे, बाळू इंगोले, विठ्ठल राऊत, अर्चना काकडे, प्रमोद बोरकर, सदानंद जयस्वाल, भास्कर डेकाटे, डॉ. समर्थ मस्के, तुळशीदास चटे, गोकुला वैरागडे, संजय देशमुख, रामा कन्नाके, पद्माकर कडू, सुभाष मुळे, माधुरी देशमुख, बालु लोटकर, किसना चुटे, चंद्रशेखर ठवकर, सुरज कांबळे उपस्थित होते. रामटेक विधानसभा मतदार संघात मुळक यांनी कन्हान येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. बोरी, नीलज, सिंगारदिप येथे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी छाया रंग, शक्ती पात्रे, सतीश भसारकर, मोहसिन खान, आकीब सिद्दीकी, मनीष भिवगडे, संदीप यादव, प्रमोद वानखेडे उपस्थित होते. कामठी मतदारसंघात वरेगाव येथे त्यांनी काढलेल्या पदयात्रेला प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत नानाभाऊ कांबळे, सरिता बेलेकर, हुकूमचंद आमधरे, केशर बेलेकर, कमलाकर मोहोड, वासुदेव बेलेकर, लीलाधर भोयर, धर्मराज आदमने, सुनील दुधपचारे, पुंडलिक काकडे सहभागी झाले होते.