शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

Maharashtra Assembly Election 2019 : माझे मत लोकशाहीला, होय मी मतदान करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:34 AM

विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था मतदान जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्देविविध संघटना करणार मतदारांना आवाहन : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली संघटनंची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पाळावे तसेच ‘माझे मत अमूल्य असून मी मतदान करणार’ असा संकल्प प्रत्येक मतदाराने करावा यासाठी विविध संस्था तसेच संघटनांनी पुढाकार घेतला आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था मतदान जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात मंगळवारी इंडियन मेडिकल असोसिएशन, चार्टर्ड अकाऊंटट ऑफ इंडिया (नागपूर शाखा), शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या विविध संघटनांची बैठक जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहरातील सुमारे २१०० मतदान केंद्रांवर ५० टक्केपेक्षा कमी मतदान झाले होते. विधानसभेसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. शहरातील प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, मतदारांना जागृत करण्याच्या दृष्टीने स्वीप कार्यक्रमांतर्गत प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.मतदारांमध्ये मतदान करण्यासंदर्भात वैद्यकीय व्यावसायिक, सनदी लेखापाल तसेच अभियंत्याची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात सामूहिक आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी आयएमएच्या डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ.अल्का मुखर्जी, डॉ.झुनझुनवाला, डॉ.प्रियंका कांबळे, डॉ.इम्रान आदींनी संघटनेच्यामार्फत जनतेला आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगितले. मतदान जागृती अभियानामध्ये सहभाग म्हणून प्रत्येक हॉस्पिटल तसेच क्लिनीकमध्ये मतदानासंदर्भात मार्गदर्शन व आवाहन करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.आर.पातुरकर, नागपूर महानगर पालिकेचा आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनीही मतदार जागृती अभियानात सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.सनदी लेखापालांचा मतदार जागृतीमध्ये सहभागमतदार जागृती अभियानामध्ये सनदी लेखापालांच्या संघटनेचा सहभाग राहणार असून विदर्भातील सुमारे ४५०० सनदी लेखापाल तसेच १२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत ‘मी मतदान करणार’ या मोहिमेअंतर्गत २१ ऑक्टोबर रोजी मतदान करण्याचा संकल्प करण्यात येणार असल्याची माहिती सनदी लेखापाल संघटनेचे प्रमुख जुल्फेस शाह, अक्षय गुल्हाने, हरीष रंजवानी, जितेंद्र संगवानी, संजय अग्रवाल, साकेत बागडीया आदींनी केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019collectorजिल्हाधिकारी