शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Maharashtra Assembly Election 2019 : सूक्ष्म-लघु उद्योगातून पाच कोटी रोजगार निर्माण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:52 IST

पुढील पाच वर्षांत देशभरात पाच कोटी रोजगारांची निर्मिती करणाचा मी संकल्पच घेतला असून तशी पावलेदेखील उचलली जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांना आपल्या देशात प्रचंड महत्त्व आहे. या उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता आहे व त्या दिशेने काम सुरू आहे. या उद्योगांतून पुढील पाच वर्षांत देशभरात पाच कोटी रोजगारांची निर्मिती करणाचा मी संकल्पच घेतला असून तशी पावलेदेखील उचलली जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. दक्षिण नागपुरातील भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.दिघोरी येथे आयोजित या सभेला आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, शिवसेना नेते शेखर सावरबांधे प्रामुख्याने उपस्थित होते. मागील पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात प्रचंड विकास कामे झाली आहेत. सिंचनासाठी प्रचंड कामे झाली व निधीदेखील मिळाला. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर राज्यातील सिंचन ५० टक्क्यांवर जाईल व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे गडकरी म्हणाले. फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूरनेदेखील कात टाकली असून विकासाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. अजनीला आम्ही जगातील सर्वोत्तम रेल्वेस्थानक म्हणून विकसित करू. येथे ‘मल्टिमॉडेल हब’ विकसित होत असून, सर्व बसेसदेखील येथूनच सुटतील. शिवाय रेल्वेचा कारखाना विदर्भात सुरू होत असून, त्यामुळे रोजगारनिर्मिती होईल,असेदेखील ते म्हणाले.काँग्रेस नेत्यांना ‘करंट’ लावाकाँग्रेसचे नेते हिरवं दिसलं तिकडे धावतात. शेवटी मीच देवेंद्र फडणवीस यांना म्हटल की पक्षाचे कुटुंबनियोजन करा. नाही तर आमचेच नेते नाराज होतील. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकाळात शाळा-महाविद्यालय उघडली. आता त्यांना निकालातून ‘करंट’ लावा, असे गडकरी म्हणाले.मला म्हातारा करू नकाआपल्या भाषणादरम्यान अनेक नेते मला पितृतुल्य म्हणतात. काही दिवसांअगोदर चित्रपट अभिनेते खा. सनी देओल यांच्याशी भेट झाली. त्यांनी सांगितले की, ते माझ्याच वयाचे आहे. जर सनी देओल हिरो असेल तर मीदेखील हिरोच आहे. मला पितृतुल्य म्हणून म्हातारा करू नका, अशी कोपरखळी गडकरी यांनी मारली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Gadkariनितीन गडकरीnagpur-south-acनागपूर दक्षिण