शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक अधिकाऱ्यांच्या 'पोस्टल बॅलेट' मतदानास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 9:55 PM

निवडणुकीत तैनात असलेल्यांपैकी १६,५०० च्या वर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्यासाठी अर्ज केला असून त्याद्वारे अनेकांनी तो भरून मतदानाचा हक्क बजावला.

ठळक मुद्दे१६,५०० कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसाठी केला अर्ज :२३ तारखेपर्यंत करु शकणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या कामात तैनात असलेले अधिकारी कर्मचारीमतदानापासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्या पोस्टल मतदानास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. निवडणुकीत तैनात असलेल्यांपैकी १६,५०० च्या वर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्यासाठी अर्ज केला असून त्याद्वारे अनेकांनी तो भरून मतदानाचा हक्क बजावला. उर्वरितांना पोस्टल बॅलेट पोस्टाद्वारे घरपोच पाठविण्यात येणार असून २३ तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत तो भरून देता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितल की, निवडणुकीच्या कामात ज्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली आहे, त्यांना मतदान करता यावे, यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली होती. अधिकारी कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतला. आता जे कर्मचारी पोस्टल बॅलेट भरून देऊ शकले नाही. त्यांना ते पोस्टाने पाठवण्यात येईल. पोस्टल बॅलेट अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळेत मिळावे यांसाठी पोस्टाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. पोस्टाकडे वाहनांची कमी असल्याने त्यांना आवश्यक वाहनेही पुरविण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचा पत्ता शोधण्यासाठी अत्याधुनिक प्रणालीचाही उपयोग करण्यात येईल. सर्व कर्मचाऱ्यांना वेळेत पोस्टल बॅलेट मिळेल, याची खरबदार घेण्यात येत आहे. शनिवारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांपर्यंत पोस्टल बॅलेट पोहचतील. ते त्यांना २३ तारखेपर्यंत गॅझेटेड ऑफिसरच्या स्वाक्षरीने भरून द्यायचे आहे. त्यामुळे २० तारखेला सुद्धा जेव्हा पोलिंग पार्टी निवडणुकीचे साहित्य घेऊन रवाना होईल, त्या दिवशी सुद्धा त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पोस्टल बॅलेट भरून देण्याची संधी उपलब्ध राहील. थेट पोस्टाने येणारे बॅलेट पेपर मतमोजणीच्या दिवशी २४ तारखेला सकाळपर्यंत स्वीकारले जातील, असेही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके उपस्थित होते.‘व्होटर स्लिप’ पोहोचल्या नसतील तर तक्रार करामागील निवडणुकीत व्होटर स्लिपचा चांगलाच घोळ झाला होता. त्यामुळे यंदा मतदानाच्या काही दिवस आधीच व्होटर स्लिप मतदारांना देण्याचा मानस असून, आतापर्यंत ७० टक्के मतदारांना व्होटर स्लिप वाटप करण्यात आल्या आहेत. १०० टक्के मतदारांपर्यंत व्होटर स्लिप पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. सर्व मतदारांना घरपोच व्होटर स्लिप मिळेल. दोन दिवसात शंभर टक्के वाटप होईल. यानंतरही कुणाला व्होटर स्लीप मिळाली नाही तर त्यांनी १९५० या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करावी, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Employeeकर्मचारीVotingमतदान