शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनो दक्ष राहा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 22:22 IST

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरु असून, निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक प्रयत्न करावेत.

ठळक मुद्देनिवडणूक खर्च निरीक्षकांची आढावा बैठक

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरु असून, निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक प्रयत्न करावेत. पुढील काही दिवस अत्यंत जबाबदारीने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत दक्ष राहा, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवीद्र ठाकरे यांनी दिल्यात.बुधवारी बचत भवन सभागृहात निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, पोलीस अधीक्षक राकेश ओला, निवडणूक खर्च निरीक्षक सुब्राज्योती चक्रवर्ती, गौतम पात्रा, दुर्गविजय सिंह, प्रसन्था एन., जयसिंह, चंद्र्रप्रकाश वर्मा, राजेश शर्मा, सुरेश चंद्र्र, शशी भूषण, प्रतिक कुमार सिंह आणि ऐलानचेझीएन, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा हे उपस्थित होते.यावेळी निवडणूक खर्च निरीक्षकांनी नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी यांच्याकडून निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा घेतला. तसेच संबंधित नोडल अधिकाºयांना विविध सूचना केल्या.यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नागपूर जिल्ह्यात ग्रामीण सहा विधानसभा मतदारसंघात पोलीस यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या विशेष प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील आंतरराज्यीय तपासणी नाके, मद्यविक्री, रोख रक्कम यांची होणारी वाहतूक आदीबाबत पोलीस यंत्रणेने केलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.सायबर सेलच्या नोडल अधिकारी उपायुक्त श्वेता खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामांची माहिती आणि आता विधानसभा निवडणुकीत सायबर सेलकडून केली जाणारी प्रक्रिया याबाबतची माहिती दिली. तसेच सी-व्हीजील अ‍ॅपवर मतदारांकडून येणाºया तक्रारी, त्यावरील होत असलेली दैनंदिन कार्यवाही याबाबतची माहिती दिली. तसेच निवडणुका निर्भय आणि मुक्त तसेच पारदर्शी वातावरणात पार पाडाव्यात यासाठी शहर पोलीस यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.यावेळी जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून करण्यात येत असलेल्या मजकुराचे प्रमाणीकरण आणि पेड न्यूज तसेच सायबर सेलकडून येणाºया तक्रारींच्या कामाची माहितीही नोडल अधिकारी अनिल गडेकर यांनी निवडणूक निरीक्षकांना दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर