शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : बावनकुळे यांना यापेक्षा मोठे पद मिळेल : मुख्यमंत्र्यांचे अभिवचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 20:23 IST

बावनकुळे हे आमच्या पक्षाचे हिरा आहेत. त्यांच्या भवितव्याची जबाबदारी आमची आहे. भविष्यात त्यांना यापेक्षाही मोठे पद देऊ, असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कन्हान (नागपूर) येथील जाहीर सभेत दिले.

ठळक मुद्देमगरीचे अश्रू वाहणाऱ्यांना चिमटा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नाही. बावनकुळे हे आमच्या पक्षाचे हिरा आहेत. त्यांच्या भवितव्याची जबाबदारी आमची आहे. भविष्यात त्यांना यापेक्षाही मोठे पद देऊ, असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कन्हान (नागपूर) येथील जाहीर सभेत दिले.कामठी मतदारसंघात उमेदवारी वाटपाच्या वेळी महानाट्य घडले. शेवटच्या क्षणी बावनकुळे यांना तिकीट मिळाले नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्याचे पडसाद विदर्भातही उमटले. यात अंतर्गत राजकारण झाले अशा विविध अफवा, वावड्या निर्माण झाल्या. परंतु असे काही नसल्याचे दोन दिवसात स्पष्ट झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बावनकुळे यांची पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली. या माध्यमातून बावनकुळे यांच्याकडे ३२ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली.दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम विदर्भातील जाहीर सभांमध्ये बावनकुळेंना बोलावून घेतले होते. धारणी, कारंजा आणि चिखलीच्या सभांमध्ये बावनकुळे यांना शहा यांनी पूर्णवेळ सोबत ठेवले ठेवले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही बावनकुळे यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, लवकरच त्यांचे पुनर्वसन करण्याचा शब्द मी देतो, असे जाहीर सभांमध्ये सांगितले.कन्हानच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काही लोक सांगतात बावनकुळेंचे तिकीट कापले, त्यांचे काय होणार? जे लोक मगरीचे अश्रू वाहत आहेत त्यांना मी सांगून देतो, बावनकुळेंची चिंता तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. बावनकुळे आहेत त्यापेक्षा मोठे झालेले दिसतील. त्यांची चिंता करण्याची आवश्यकता नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठासून सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या उघड पाठबळामुळे बावनकुळे यांच्या समर्थकांना भविष्यातील शुभसंकेतच मिळाले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेkamthi-acकामठी