Maharashtra Assembly Election 2019 : अमित शहा यांची आज खापरखेड्यात जाहीर सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:20 IST2019-10-18T00:19:42+5:302019-10-18T00:20:12+5:30
केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आज विदर्भात चार प्रचार सभांना संबोधित करतील. यात ते सायंकाळी ६ वाजता नागपुरातील खापरखेडामध्ये भाजपचे सावनेर व कामठीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करतील.

Maharashtra Assembly Election 2019 : अमित शहा यांची आज खापरखेड्यात जाहीर सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आज विदर्भात चार प्रचार सभांना संबोधित करतील. यात ते सायंकाळी ६ वाजता नागपुरातील खापरखेडामध्ये भाजपचे सावनेर व कामठीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करतील.
अमित शहा यांचे सकाळी १०.२० वाजता दिल्लीवरून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने थेट गडचिरोलीतील अहेरीला जातील. तिथे दुपारी १२ वाजता सभा होईल. सभेनंतर हेलिकॉप्टरने राजुरा येथे जातील. तिथे दुपारी २.१५ वाजता सभेला संबोधित करतील. त्यानंतर ३.५० वाजता यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील सभेला संबोधित करतील. तेथून सायंकाळी ५ वाजता हेलिकॉप्टरने खापरखेडा येथील हॅलिपेडवर पोहोचतील. येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित जाहीर सभेला मार्गदर्शन करतील.