शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मा. गो. वैद्य अनंतात विलीन, संघप्रमुख भागवत अन् गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 13:15 IST

अंबाझरी स्मशानभूमीत डिझेल शवदाहीनीत अंत्यसंस्कार

ठळक मुद्देसंघाचा शब्दकोष हरवला - मोहन भागवत

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले प्रवक्ते, माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख, हिंदुत्वाचे प्रखर भाष्यकार ज्येष्ठ संपादक बाबुराव उपाख्य माधव गोविंद वैद्य अर्थात मागो अनंतात विलिन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंबाझरी स्मशानभूमीत डिझेल शवदाहीनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पुत्र धनंजय यांनी अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडली. यावेळी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, राज्याचे माजी माहिती संचालक सहस्रभोजनी, संघाचे प्रचारक प्रसाद महानकर, गणेश शेटे, क्षितिज गुप्ता, आ. परीणय फुके, आ. विकास कुंभारे यांच्यासह वैद्य कुटुंबीयांचे आप्त व चाहते उपस्थित होते.  

रविवार सकाळी ९.३० वाजता त्यांचे राहते घर ८०, विद्याविहार, प्रतापनगर, येथून अंत्ययात्रा निघाली. अंबाझरी घाटावर दोन मिनिटे माैन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संघाचा शब्दकोष हरवला - मोहन भागवतअंत्ययात्रेपूर्वी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी घरी जाऊन वैद्य कुटुंबीयांचे सात्वंन केले. वैद्य यांच्या जाण्याने संघाचा शब्दकोश हरवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते संघ विचार जगले. सल्लामसलत करण्याचे ते हक्काचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने आता काही विचारायचे ते कुठे, असा रिक्तपणा निर्माण झाला आहे. जीवन कसे जगावे याचे आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिले, अशी शोकसंवेदना भागवत यांनी व्यक्त केली. दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी रात्री घरी जाऊन वैद्य कुटुंबीयांचे सात्वंन केलेे.

३१ डिसेंबरला श्रद्धांजली सभा   ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता रेशिमबाग येथील महर्षी व्यास सभागृह येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यूAnil Deshmukhअनिल देशमुखRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत