शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रियकराची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:32 IST

गांधीबाग पार्क परिसरात खळबळ  

नागपूर : एकमेकांचे होणार नाही, हे ध्यानात आल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून एकसाथ जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. तोंडात घेताच प्रेयसीने जहर ओकले मात्र प्रियकराने ते पिल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी सायंकाळी ४. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने गांधीबाग पार्क परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.  

पुणेजवळ राहणारा ओमकार कुताड (वय २३) बीएच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. तीन वर्षांपूर्वी त्याची नागपुरातील एका तरुणीसोबत फेसबूकवरून फ्रेण्डशिप झाली. सलग संपर्कामुळे त्यांचे प्रेम फुलले. नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. हिम्मत करून त्याने तिचे घर गाठले आणि तिच्या कुटुंबीयांना तिचा हात मागितला. घरच्यांनी स्पष्ट इन्कार केला. तो निराश होऊन परतला मात्र त्यांचा ऑनलाईन संपर्क सुरू होता. दरम्यान, तिचे घरच्यांनी लग्न जुळविले. तिने हे दोन दिवसांपूर्वी त्याला कळविले. तो अस्वस्थ झाला. थेट नागपुरात पोहचला.

मंगळवारी दुपारी हे दोघे गांधीबागमधील पार्कमध्ये भेटले. जिना मरना संग संग, अशा शपथा घेणा-या या दोघांनी आपल्याला सोबत जगता येणार नाही, असा समज करून घेतला. त्यामुळे दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला. तोंडात घेताच कडवटपणाने ओकारी आल्यामुळे प्रेयसी बचावली. मात्र, विषाचा घोट घेतल्याने प्रियकर लगेच तडफडू लागला. त्याची ती अवस्था पाहून प्रेयसी जोरजोरात ओरडली. गार्डसह बाजुची मंडळी धावली. त्यांनी या दोघांना मेयोत पोहचवले. माहिती कळाल्यानंतर तहसील पोलीसही पोहचले. प्रियकराची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त लिहिताना पोलिसांकडून कळले. विष कुठून आणले 

या दोघांना मृत्यूच्या जबड्यात पोहचविणारे विष कुणी आणि कुठून आणले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. विष घेण्याऐवजी ते पळून जाऊन लग्न करू शकले असते. त्यांनी तसे न करता आत्मघाताचा निर्णय का घेतला, असाही प्रश्न पोलिसांना पडला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी