शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार दिल्याने प्रेयसीचा प्रियकरावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 20:03 IST

Nagpur News लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रेयसीने प्रियकरावर प्राणघातक हल्ला चढवून चाकूने वार केले. ताे जखमी अवस्थेत घराबाहेर पळाल्याने बचावला.

ठळक मुद्देआराेपी महिलेस अटक

नागपूर : लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रेयसीने प्रियकरावर प्राणघातक हल्ला चढवून चाकूने वार केले. ताे जखमी अवस्थेत घराबाहेर पळाल्याने बचावला. आराेपी प्रेयसी ही घटस्फाेटित असल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली असून, तिला अटक करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले. ही घटना वाडी शहरातील दत्तवाडी परिसरात साेमवारी (दि. १७) रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास दिली.

अक्षय कृष्णाजी ढोके (२७, रा. गुरुप्रसादनगर, दत्तवाडी, वाडी) असे जखमी प्रियकराचे नाव असून, ताे वाडी परिसरातील बिस्कीट कंपनीमध्ये नाेकरी करताे. ताे दत्तवाडी परिसरात किरायाने राहताे. त्याचे ३० वर्षीय महिलेशी दाेन वर्षांपासून प्रेमसंबंध हाेते. ती घटस्फाेटित असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. काही कारणांमुळे महिनाभरापासून त्यांच्या संबंधात दुरावा निर्माण झाल्याने अक्षयने तिच्याशी असलेले मैत्रीचे संबंध ताेडले हाेते. त्यामुळे ती संतापली हाेती.

ती साेमवारी रात्री अक्षयच्या खाेलीवर गेली आणि तू माझ्याशी मैत्री का ताेडली, लग्न करण्यास नकार का दिला, अशी अक्षयला विचारणा करीत त्याच्याशी भांडायला लागली. याच भांडणात तिने अक्षयवर चाकूने वार केले. त्यामुळे स्वत:ला वाचविण्यासाठी वाचवा-वाचवा ओरडत बाहेर पळला. त्यातच परिसरातील दुकानदार व इतर नागरिक त्याच्या मदतीला धावले.

त्यांनी अक्षयला लगेच वाडी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. माहिती मिळताच पाेलिसांनी अक्षयला गाठून त्याचे बयाण नाेंदवून घेत प्रेयसीविरुद्ध भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश फुलकव्हर करीत आहेत.

पाहून घेण्याची धमकी

अक्षयने मैत्रीचे संबंध ताेडल्याने त्याची प्रेयसी चिडली हाेती. काही दिवसांपूर्वी तिने अक्षयच्या आईशी माेबाइल फाेनवर संपर्क करून तुमच्या मुलाने माझ्याशी मैत्री का ताेडली, अशी विचारणा करीत अक्षयला पाहून घेण्याची धमकी दिली हाेती, अशी माहिती त्याच्या आईने दिली.

...

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी