नागपुरात पेट्रोल दरवाढीविरोधात निदर्शने, लॉलीपॉप वाटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:33 IST2018-10-11T22:33:03+5:302018-10-11T22:33:58+5:30
पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने गुरुवारी वाहन चालकांना लॉलीपॉप वाटून आपला निषेध व्यक्त केला. युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यात पुकारण्यात आलेल्या आंदोलनांतर्गत शहरात ग्रेट नाग रोडवर आंदोलन करण्यात आले.

नागपुरात पेट्रोल दरवाढीविरोधात निदर्शने, लॉलीपॉप वाटले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने गुरुवारी वाहन चालकांना लॉलीपॉप वाटून आपला निषेध व्यक्त केला. युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यात पुकारण्यात आलेल्या आंदोलनांतर्गत शहरात ग्रेट नाग रोडवर आंदोलन करण्यात आले.
युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भूषण मरसकोल्हे व रोहीत खैरवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी शासन विरोधी घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तौसीफ खान, प्रशांत धोटे, अक्षय घाटोळे, स्वप्निल ढोके,चेतन डाफ, अनुष नियोगी, सौरभ शेळके, स्वप्निल बावनकर, हेमंत कातुरे, कुणाल पुरी आदी सहभगी झाले होते.
उत्तर नागपुरातही आंदोलन
उत्तर नागपूर युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष अनमोल लोणारे यांच्या नेतृत्वात उत्तर नागपुरातही पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. १० नंबर पुलाजवळ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निर्देश्ने केली. आंदोलनात नगरसेवक संदीप सहारे, नेहा राकेश निकोसे, पंकज लोणारे, निलेश खोरगडे, इरशाद अली, इरशाद शेख, शेख शाहनवाज, संतोष लोणारे आदींचा समावेश होता.