येत्या २ फेब्रुवारीला नागपुरात लोकमत महामॅरेथॉन सीझन ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:31 IST2019-12-28T12:30:57+5:302019-12-28T12:31:28+5:30

नववर्षात २ फेब्रुवारीला लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे नागपुरात महामॅरेथॉन सीझन ३ चे आयोजन करण्यात येत आहे.

Lokmat Mahamarathon Season 3 at Nagpur on February 2 | येत्या २ फेब्रुवारीला नागपुरात लोकमत महामॅरेथॉन सीझन ३

येत्या २ फेब्रुवारीला नागपुरात लोकमत महामॅरेथॉन सीझन ३

ठळक मुद्देगेल्या दोन सीझनमध्ये १५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नववर्षात २ फेब्रुवारीला लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे नागपुरात महामॅरेथॉन सीझन ३ चे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरकरांसाठी उत्साहाचा व कौतुकाचा विषय ठरलेली ही महामॅरेथॉन गेल्या दोन वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या दोन्ही सीझन मिळून सुमारे १८ हजारांहून अधिक नागरिकांनी यात सहभाग नोंदवला आहे. यात आबालवृद्ध तर आहेतच शिवाय दिव्यांगही मोठ्या उत्साहाने यात सहभागी होताना दिसले आहेत.
यात हाफ मॅरेथॉन ही २१ कि.मी, पॉवर रन १० कि.मी., फन रन ५ कि.मी आणि फॅमिली रन ३ कि.मी. चे राहणार आहे. प्लास्टो यांच्या सहकार्याने व नागपूर महामेट्रोच्या पाठिंब्याने ही मॅरेथॉन संपन्न होणार आहे.

Web Title: Lokmat Mahamarathon Season 3 at Nagpur on February 2