लोकमत मदतीचा हात : ब्लड कॅन्सरशी झुंजते चिमुकली उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:40 AM2020-05-27T01:40:03+5:302020-05-27T02:17:10+5:30

अवघ्या तीन वर्षाची उन्नती. कॅन्सर म्हटले की कुणाच्याही मनात धडकी भरते. तिला मात्र आपण कुठल्या मोठ्या आजाराच्या विळख्यात सापडलो याची जाणीवही नाही. तिच्या चेहऱ्यावर आहे ती गोड निरागसता. तिला जाणीव नसली तरी आपल्या गोंडस बाळाच्या चिंतेने आईवडिलांचे डोळे व्याकुळ झाले आहेत. तुटपुंजी मिळकत, त्यातही लॉकडाऊनमुळे तीही बंद झाल्याने उपचाराचा खर्च कसा करावा, या प्रश्नाने वडिलांना असहाय्य केले आहे.

Lokmat helping hand: Chimukli Unnati fights blood cancer | लोकमत मदतीचा हात : ब्लड कॅन्सरशी झुंजते चिमुकली उन्नती

लोकमत मदतीचा हात : ब्लड कॅन्सरशी झुंजते चिमुकली उन्नती

googlenewsNext
ठळक मुद्देसुरक्षा गार्ड वडिलांची धडपड : मदतीसाठी हवी संवेदनेची साथ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवघ्या तीन वर्षाची उन्नती. कॅन्सर म्हटले की कुणाच्याही मनात धडकी भरते. तिला मात्र आपण कुठल्या मोठ्या आजाराच्या विळख्यात सापडलो याची जाणीवही नाही. तिच्या चेहऱ्यावर आहे ती गोड निरागसता. तिला जाणीव नसली तरी आपल्या गोंडस बाळाच्या चिंतेने आईवडिलांचे डोळे व्याकुळ झाले आहेत. तुटपुंजी मिळकत, त्यातही लॉकडाऊनमुळे तीही बंद झाल्याने उपचाराचा खर्च कसा करावा, या प्रश्नाने वडिलांना असहाय्य केले आहे.
समाधाननगर, पोलीस लाईन टाकळी येथे राहणारे रवींद्र तिवारी हे सुरक्षा रक्षक म्हणून सेवारत होते. या तुटपुंज्या कमाईतच ते पत्नी व दोन मुलांचा संसार चालवीत आहेत. या परिस्थितीत काळही जणू त्यांची परीक्षा घ्यायला टपलेला. त्यांची लहान मुलगी उन्नती वारंवार आजारी पडते म्हणून डॉक्टरांच्या सूचनेनुसार काही चाचण्या केल्या आणि ती अनामिक भीती खरी ठरली. उन्नतीला ब्लड कॅन्सर आहे. डॉक्टरांचे हे शब्द कुणीतरी आघात केल्यासारखे होते. काय करावे, या विचाराने डोके सुन्न झाले. पण खचून जाऊन, निराश होऊन चालणार नव्हते.
उन्नतीला महिनाभरापूर्वी जामठास्थित कॅन्सर रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅन्सर असला तरी तो पहिल्या स्टेजमध्ये आहे आणि उपचाराने तो बरा होऊ शकतो, या डॉक्टरांच्या शब्दाने त्यांना मोठा दिलासा दिला. आता प्रश्न होता उपचाराची व्यवस्था करण्याचा. त्यांनी निकाराचे प्रयत्न चालविले. जवळ असलेली सर्व जमापुंजी आतापर्यंतच्या उपचारात लावली. शासकीय योजनेतून मुलीच्या किमोथेरपीची व्यवस्था झाली पण इतर उपचारासाठी आणखी पैशाची गरज, पूर्ण उपचार करण्यासाठी ७ ते ८ लाख खर्च येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. मित्र, नातेवाईक अशा सर्वांकडून त्यांनी मदत घेतली. मुलीला जगविण्यासाठी कुठलेही प्रयत्न अपुरे राहू नये, ही वडिलांची भावना. मात्र खर्चाचा डोंगर पार करायला या सामान्य सुरक्षा गार्डचे प्रयत्न अपूर्ण ठरतात की काय, ही भीती त्यांना सतावत आहे.
निरागस उन्नतीला वाचविण्यासाठी यावेळी समाजाच्या संवेदनेची गरज आहे. उन्नती कॅन्सरच्या पहिल्या स्टेजवर आहे आणि नक्कीच जगू शकते, मात्र पैशाअभावी उपचार थांबू नये. त्यामुळे संवेदनशील नागरिकांनी सढळ हाताने तिच्या उपचारासाठी पुढे येण्याची गरज आहे तरच निष्पाप उन्नतीच्या चेहरा पुन्हा हास्याने फुलेल.
ज्या नागरिकांना उन्नतीच्या उपचारासाठी मदत करायची असेल त्यांनी रवींद्र तिवारी यांच्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या ३३५७५०८७४४ या खाते क्रमांकावर मदत जमा करावी. बँक शाखेचा आयएफएससी कोड ‘सीबीआयएनओ२८३५७२’ असा आहे. उन्नतीच्या तब्बेतीबाबत किंवा मदतीबाबत आपण रवींद्र तिवारी यांच्या ८३०८२६०९८७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Web Title: Lokmat helping hand: Chimukli Unnati fights blood cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.