शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

-तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 20:01 IST

नागपुरात गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलेली कोविड-१९ रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरू झालेल्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. मात्र, नागपुरात नागरिकांकडून दिशानिर्देशाचे पालन होत नाही, हे गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत झालेल्या वाढीने सिद्ध केले आहे. यापुढेही जर अशीच परिस्थिती राहिली तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

ठळक मुद्देदिशानिर्देशाचे कडक पालन करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलेली कोविड-१९ रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरू झालेल्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. मात्र, नागपुरात नागरिकांकडून दिशानिर्देशाचे पालन होत नाही, हे गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत झालेल्या वाढीने सिद्ध केले आहे. यापुढेही जर अशीच परिस्थिती राहिली तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.नागपुरातील कोरोनाच्या परिस्थितीवर शनिवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी कोरोनासंदर्भात नागपुरातील परिस्थितीवर भाष्य केले. मुंढे म्हणाले, नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला होता. आज ११ जुलै आहे. चार महिन्यात रुग्णांची संख्या १७८९ इतकी आहे. मात्र, ही संख्या गेल्या दीड महिन्यात झपाट्याने वाढली. राज्य शासनाने १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत मिशन बिगीन अगेन सुरु केले. याअंतर्गत काही बंधने पाळून आणि दिशानिर्देशाचे पालन करून नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार करण्याची मुभा दिली. जर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये, असेही राज्य शासनाने म्हटले होते. मात्र, राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर महानगरपालिकेने दिलेल्या दिशानिर्देशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे लक्षात आले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर आणखी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे दिशानिर्देर्शांचे पालन करा, स्वत: सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

उल्लंघन करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखललॉकडाऊनचा निर्णय घेण्याअगोदर सोमवारपासून मनपा आणि पोलीस प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वॉच ठेवणार आहे. कुणी नियम तोडताना आढळून आल्यास मनपा आणि पोलीस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती नागरिकांनी द्यावी. अशा नियम मोडणाऱ्या व्यक्ती, संस्था, खासगी कार्यालये आदींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.दुकानदार व ग्राहक मोडताहेत नियमदुकाने सुरू करण्यासंदर्भातील काही नियम आहेत. बाजार परिसरातील दुकाने एका बाजूची एक दिवस आणि दुसऱ्या बाजूची दुसऱ्या दिवशी उघडावी, तसे दिवस ठरवून देण्यात आले आहेत. दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ अशी आहे. मात्र, हा नियमही पाळला जात नाही. दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकान मालकांची आहे. त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.अकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढलीअनेक जण विनाकारण शहरात फिरत आहे. दुचाकींवर दोन व्यक्ती तर चार चाकी वाहनांत पाच-पाच व्यक्ती फिरत आहे. परिणामी आता नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.खासगी कार्यालयांमध्येही उल्लंघनखासगी किंवा शासकीय कार्यालयात १५ व्यक्ती किंवा १५ टक्के यापेक्षा जी संख्या अधिक असेल त्या संख्येत कर्मचाऱ्यांना बोलावून काम करण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु त्याचेही उल्लंघन होत आहे.मध्यवर्ती कारागृह नवा हॉटस्पॉटनागपूर मध्यवर्ती कारागृहातील ५०० कैद्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे ३०० कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. अजून सुमारे १२०० जणांची चाचणी व्हायची आहे. त्यातून मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. एकंदरच मध्यवर्ती कारागृह आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला आहे. असे हॉटस्पॉट नागपूर शहरात इतरत्र तयार होऊ नये, असे वाटत असेल तर कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी दिशानिर्देशाचे पालन करा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcorona virusकोरोना वायरस बातम्या