शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावरील नेसकॅफे स्टॉलला कुलूप ठोकले

By admin | Updated: July 9, 2015 02:51 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर ५ जुलैला ३ प्रवाशांना रक्तबंबाळ होईपर्यंत नेसकॅफे स्टॉलचा व्यवस्थापक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती.

प्रवाशांना मारहाण प्रकरण : स्टॉलवरील महिला कर्मचाऱ्याचे निलंबननागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर ५ जुलैला ३ प्रवाशांना रक्तबंबाळ होईपर्यंत नेसकॅफे स्टॉलचा व्यवस्थापक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. दरम्यान रेल्वे प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन नेसकॅफे स्टॉलला कुलूप ठोकले आहे तर १५ रुपयाची पाण्याची बाटली २० रुपयांना विकणाऱ्या रेल्वे स्टॉलवरील महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ही गंभीर बाब उजेडात आणली होती.नागपूर रेल्वेस्थानकावर रविवारी कुर्ला-हटिया एक्स्प्रेसमधील १५ प्रवासी प्लॅटफार्म क्रमांक सहावर उतरले. त्यांनी नेसकॅफे स्टॉलवर पाण्याच्या बाटलीची किंमत विचारली असता त्यांना ५ रुपये जास्त किंमत सांगण्यात आली. किंमत अधिक कशी आकारता असे प्रवाशांनी विचारल्यानंतर त्यांना नॅसकॅफेच्या व्यवस्थापकाने उद्धट वागणूक दिली होती. त्यानंतर प्रवाशांनी याच प्लॅटफार्मवरील रेल्वेच्या स्टॉलवर पाण्याच्या बाटलीची किंमत विचारली असता तेथील महिला कर्मचाऱ्याने २० रुपये किमत सांगितली. प्रवासी उपस्टेशन व्यवस्थापकांकडे तक्रार करून रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडत असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ नेसकॅफेचा व्यवस्थापक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी तीन प्रवाशांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. याची तक्रार लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान रेल्वे प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन नेसकॅफेच्या स्टॉलला कुलूप ठोकले असून रेल्वे स्टॉलवरील महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या महिला कर्मचाऱ्यावर कार्यालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्रा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)