शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

झोन सभापतीसाठी भाजपमध्ये लॉबिंग

By admin | Updated: April 25, 2015 02:24 IST

महापालिकेच्या दहाही झोनच्या सभापतिपदासाठी येत्या ३० एप्रिल रोजी निवडणूक होऊ घातली आहे. महापालिकेत भाजप बहुमतात आहे.

नागपूर : महापालिकेच्या दहाही झोनच्या सभापतिपदासाठी येत्या ३० एप्रिल रोजी निवडणूक होऊ घातली आहे. महापालिकेत भाजप बहुमतात आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांनी संधी मिळण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. शिवाय लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षासाठी चांगले काम करणाऱ्यांनाही बक्षीस द्यायचे आहे. यामुळे सभापतिपदाची नावे निश्चित करताना भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. झोन सभापतीची निवड एक वर्षासाठी केली जाते. सभापतिपद मिळाल्यानंतर या झोन अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागांवर अप्रत्यक्षपणे नियंत्रण मिळविता येते. संबंधित पदावरील व्यक्तीला याचा राजकीय फायदाही होतो. त्यामुळे इतरत्र संधी न मिळालेल्या नगरसेवकांचा झोन सभापतिपदासाठी आग्रह असतो. सध्या सात झोनमध्ये भाजपचे सभापती आहेत. काँग्रेस, बसपा व शिवसेनेचा प्रत्येकी एक सभापती आहे. या वेळीही निवडणुकीत फारशी समीकरणे बदलणार नाहीत, असेच चित्र आहे. काँग्रेसकडे एकाही झोनमध्ये संख्याबळ नाही. मात्र, भाजपला याकडे डोळेझाक करून कुठलीही रिस्क घ्यायची नाही. यामुळे विजय निश्चित असला तरी भाजप सावध पवित्रा घेण्याच्या विचारात आहे. विषय समित्यांमध्येही फेरबदलकाही विषय समित्यांमध्येही फेरबदल होण्याची शक्यता आहे. आमदार सुधाकर कोहळे यांनी जलप्रदाय समितीचा राजीनामा दिला आहे तर आरोग्य समितीचे सभापती असलेले रमेश सिंगारे हे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही समित्यांवर नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली जाईल. आरोग्य सभापतिपदासाठी लक्ष्मीनगर झोनचे सभापती गोपाल बोहरे यांचे नाव समोर आले आहे. कर व कर निर्धारण समिती, महिला व बाल कल्याण समिती, शिक्षण समिती सभापतीही बदलण्यात येणार आहे. यासाठीही मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)