शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासोबत जगायचे, लसीकरण धोक्याचे, हे सोशल माध्यमांचे खूळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST

- भ्रामक संवादांचे षडयंत्र : प्रत्येकानेच माध्यम साक्षरतेबाबत जागरूक होणे महत्त्वाचे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मानवी आरोग्यासाठी व्यस्तता ...

- भ्रामक संवादांचे षडयंत्र : प्रत्येकानेच माध्यम साक्षरतेबाबत जागरूक होणे महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मानवी आरोग्यासाठी व्यस्तता ही कायम चांगली बाब असून, त्यात स्वत:साठीची उसंत असते. मात्र, सोशल मीडियाने त्या उसंतीवरही घाला घातला आणि व्यक्ती व्यावहारिक आयुष्यातील व्यस्ततेतही रिकामटेकडा असल्यासारखेच वागायला लागला आहे. त्याचे पर्यवसान नको त्या तणावाला बळी पडण्यावर झाले आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात तर माध्यमांवर किंतु-परंतुच्या विश्लेषणांचा भडिमार झाल्याने, प्रत्येक व्यक्ती स्वत:कडे संशयाच्या नजरेने बघायला लागला आहे. जणू प्रत्येकच जण आजारी असल्याचा भास निर्माण झाला आहे. कोरोना कधीच संपणार नाही, संक्रमणासोबतच जगण्याची सवय पाडावी लागेल, भारतीय उपचार बिनकामाचे, लसीकरण धोक्याचे आदी अशा संदेशांनी सुशिक्षितही हैराण झाले आहेत. अशा संदेशांचा वापर जगपातळीवर भारतीय मानसशास्त्राला नामोहरम करण्यासाठीचे षडयंत्र म्हणून केला जात असल्याचे मत सोशल माध्यमांचे विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रत्येकानेच माध्यम साक्षरतेबाबत जागरूक होण्याचे आवाहन तज्ज्ञ विश्लेषकांनी केले आहे.

---------------------

माध्यमांतून मानसशास्त्राशी होत असलेला खेळ

* सोशल मीडिया हा एक मोठा उद्योग आहे. दररोज वेगवेगळ्या माध्यमांतून दररोज ५०० कोटी संदेश प्रसारित केले जातात.

* संदेशनिर्मिती करण्यासाठी आणि ते प्रसारित करण्यासाठी गलेलठ्ठ पगार दिला जातो.

* टार्गेटेट एरियावर जसे भारत, हा पगार आणखी भक्कम असतो.

* उपभोक्ता जितका भ्रमित होईल तितकाच लाभ माध्यमांना होतो.

* उपभोक्त्याचा इंटरेस्ट तसा, तसे पोस्ट क्रिएट केले जातात. उदा. धार्मिक, सेक्स, जातीय तेढ, कोरोना संक्रमण आदी.

* संदेशांचा भडिमार होत असल्याने खोट्या गोष्टी खऱ्या आणि खऱ्या गोष्टी खोट्या समजावण्याचा प्रयत्न केला जातो.

* वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रॉडक्ट, कंपन्यांना उपभोक्त्याच्या भ्रामकतेचा लाभ होतो.

------------------

सोशल माध्यमांच्या अराजकतेपासून वाचण्याचे उपाय

* सोशल मीडिया एज्युकेशनची गरज. अनोळखी व्यक्तीच्या संदेशावर प्रतिसाद का द्यावा, हा प्रश्न निर्माण होणे गरजेचे.

* शालेय जीवनातच इतर विषयांसोबतच सोशल मीडिया एज्युकेशनचा विषय अभ्यासात येणे गरजेचे.

* नो डिलिट, नो रिस्पॉन्सची सवय महत्त्वाची.

* पारंपरिक माध्यमांवरच जसे वृत्तपत्रे, दूरदर्शन आणि तज्ज्ञांवरच विश्वास ठेवणे महत्त्वाचे.

* फॉरेन फोबिया अर्थात जागतिक लोकांवरच विश्वास ठेवणे चुकीचे. तुमच्या देशाची मानसिकता, आरोग्याची स्थिती त्यांना नाही, ही बाब समजून घ्यावी.

* सत्य ओळखण्याची क्षमता निर्माण करणे, प्रश्न उपस्थित होण्याची सवय लावणे महत्त्वाचे.

----------------------

पारंपरिक ते न्यू मीडिया ट्रान्झेक्शन अचानक झालेले आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून नागरिकांना वाचविण्याची सर्वात मोठी जबाबदारी पारंपरिक माध्यमांचीच आहे. नैराश्य हा आजार नाही तर ते एक सिम्प्टम हे समजून घेणे महत्त्वाचे. त्यासाठी माध्यम साक्षरतेची जाणीव शिक्षणाच्या पातळीवरच विकसित करावी लागणार आहे.

- डॉ. मोईज हक, विभाग प्रमुख, जनसंवाद विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालय

----------------

सोशल मीडिया म्हणजे प्रोटोगोनिस्ट अर्थात सकारात्मक व ॲण्टोगोनिस्ट अर्थात नकारात्मकतेचे द्वंद्व आहे. ऐकिवात गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे प्रमाण मोठे आहे. युरोप, अमेरिकेत सोशल माध्यमांवरील अवाजवी संदेशांना नाही म्हणण्याची प्रक्रिया मोठी आहे. त्या तुलनेत भारतात ही प्रक्रिया अजून रूढ व्हायची आहे. या संदेशांचे सत्यापित स्रोत शोधण्याची वृत्ती वाढीस जेव्हा लागेल, तेव्हा भारतीय माणूस सोशल माध्यमांना बळी पडणार नाही.

- डॉ. धर्मेश धवणकर, प्राध्यापक, जनसंवाद विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालय

.....................