एलआयटीयूचे माजी विद्यार्थी कीर्ती गणोरकर सन फार्माच्या व्यवस्थापकीय संचालकपदी 

By आनंद डेकाटे | Updated: June 26, 2025 22:28 IST2025-06-26T22:28:00+5:302025-06-26T22:28:23+5:30

सन फार्मा ही जगातील चौथ्या क्रमांकाची स्पेशालिटी जेनेरिक फार्मा कंपनी आहे.

litu alumnus kirti ganorkar appointed as managing director of sun pharma | एलआयटीयूचे माजी विद्यार्थी कीर्ती गणोरकर सन फार्माच्या व्यवस्थापकीय संचालकपदी 

एलआयटीयूचे माजी विद्यार्थी कीर्ती गणोरकर सन फार्माच्या व्यवस्थापकीय संचालकपदी 

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एलआयटी विद्यापीठाच्या १९८८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी कीर्ती गणोरकर यांची भारतातील सर्वात मोठी औषध निर्माण कंपनी सन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सन फार्मा ही जगातील चौथ्या क्रमांकाची स्पेशालिटी जेनेरिक फार्मा कंपनी आहे. कीर्ती गणोरकर यांनी १९९६ साली सन फार्मामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून व्यवसाय विकास, विपणन, विलीनीकरण व अधिग्रहण, नवीन उत्पादनांचे सादरीकरण, प्रकल्प व्यवस्थापन, बौद्धिक संपदा हक्कआणि खटले यासारख्या अनेक नेतृत्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत.

कीर्ती गणोरकर यांनी जपानमध्ये सन फार्माचा प्रवेश साधून दिला आणि युरोपमध्ये प्रवेशासाठी आवश्यक पायाभरणी केली. त्यांनी अमेरिकेतील जेनेरिक औषधांच्या संकल्पनेपासून व्यावसायिकीकरणापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे. जून २०१९ पासून ते सन फार्माच्या भारतातील व्यवसायाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: litu alumnus kirti ganorkar appointed as managing director of sun pharma

टॅग्स :nagpurनागपूर