लायन्स क्लब नागपूरला सर्वोत्कृष्ट क्लबचा पुरस्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST2020-12-04T04:24:36+5:302020-12-04T04:24:36+5:30

नागपूर : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ एच १ च्या वतीने जागतिक सेवा सप्ताह पुरस्काराचे आयोजन अमरावती मार्गावरील चोखरदानी ...

Lions Club Nagpur Best Club Award () | लायन्स क्लब नागपूरला सर्वोत्कृष्ट क्लबचा पुरस्कार ()

लायन्स क्लब नागपूरला सर्वोत्कृष्ट क्लबचा पुरस्कार ()

नागपूर : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ एच १ च्या वतीने जागतिक सेवा सप्ताह पुरस्काराचे आयोजन अमरावती मार्गावरील चोखरदानी हॉटेलमध्ये करण्यात आले. कार्यक्रमात लायन्स क्लब नागपूर नोबलला सर्वोत्कृष्ट क्लबच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक सेवा सप्ताहात क्लबने केलेल्या सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. यासोबतच सर्वात अधिक सेवा कार्य पुरस्कार आणि बेस्ट व्हर्च्युअल प्रोग्राम इन डिस्ट्रिक्टचा समावेश आहे. कार्यक्रमाला अनिल देसाई, हेमंत नाईक, संदीप खंडेलवाल, वर्ल्ड सर्व्हिस वीक चेअरमन विलास साखरे, डॉ. मुधोजी भोसले, श्रवणकुमार, विनोद शर्मा यांच्या हस्ते लायन्स क्लब नागपूर नोबलच्या अध्यक्ष डॉ. ज्योती दलाल यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रिजन चेअरपर्सन डॉ. माया गायकवाड, प्रसन्न श्रीवास्तव, डॉ. किरण मोहता उपस्थित होत्या. संचालन अरुण चतुर्वेदी, मृणालिनी राजे भोसले यांनी केले. क्लब गरजूंना सेवा प्रदान करण्यासाठी नेहमी अग्रेसर राहणार असल्याचे डॉ. ज्योती दलाल यांनी सांगितले.

..........

Web Title: Lions Club Nagpur Best Club Award ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.