जिंदगी प्यार का गीत है
By Admin | Updated: October 6, 2014 00:54 IST2014-10-06T00:54:57+5:302014-10-06T00:54:57+5:30
रुपेरी पडद्यावरील मधूर शब्दस्वरांच्या व उत्कट प्रीती अनुभूतीच्या अर्थभावपूर्ण गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. हा कार्यक्रम कनक सूर मंदिरतर्फे

जिंदगी प्यार का गीत है
कनक सूर मंदिर : रोमांचक प्रेमगीतांचा कार्यक्रम
नागपूर : रुपेरी पडद्यावरील मधूर शब्दस्वरांच्या व उत्कट प्रीती अनुभूतीच्या अर्थभावपूर्ण गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे करण्यात आले. हा कार्यक्रम कनक सूर मंदिरतर्फे ‘जिंदगी प्यार का गीत है...’ या शीर्षकाने आयोजित करण्यात आला. या अमीट गीतांच्या कार्यक्रमाचे संगीत संयोजन संस्थेचे संचालक व गायक डॉ. दत्ता हरकरे यांचे होते.
डॉ. दत्ता हरकरे यांच्यासह त्यांच्या विद्यार्थ्यांनी यावेळी गीतांचे सादरीकरण केले. यात नवोदित गायक अनुजा केदार, नीलेश दामले, अॅड. शर्मिला चरलवार यांचा गायन सहभाग होता. प्रतिभावंत कवी - शायरांची बेमिसाल शायरी व रसिकांच्या मनाला तरंगत ठेवणारे सुरेल स्वर या कार्यक्रमात होते. एकूण २० गीते या कार्यक्रमात होती. काळाच्या कसोटीवर टिकलेली ही गुलजार गीते होती. ‘जिंदगी प्यार का गीत है...’ या सामूहिक गीताने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. जगण्यात गाणं हवं आणि गाण्यात जगणं हवं अशा स्वरानंदाचा हा कार्यक्रम होता. गायिका अनुजा केदार यांनी ‘हमने देखी है इन आँखो की महकती खूशबू, नैनो मे बदरा छाये, मोहब्बत की झुठी...’ ही गीते सादर केली.
नीलेश दामले यांनी ‘सारंगा तेरी याद मे.., मुबारक हो सबको’ ही गीते सादर करून रसिकांची दाद घेतली. शर्मिला चरलवार यांनी ‘दिल तो है दिल.., कभी तो मिलेगी, पल भर मे ये क्या हो गया’ आदी गीतांनी रंगत आणली. डॉ. दत्ता हरकरे यांनी ‘तेरी गलियाँ.., नशा ये प्यार का नशा है.., लंडन ठुमक दा, ओ बंदे कहाँ चला तू..’आदी गीतांनी रंगत आणली. श्वेता शेलगावकर यांचे निवेदन होते. याप्रसंगी युवा संगीतकार कनका आणि पल्लवी यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)