आता 'ते' समाजाचे घटक आणि देशाचे नागरिक आहेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 07:13 AM2021-07-08T07:13:13+5:302021-07-08T07:15:35+5:30

Nagpur news LGBT तृतीयपंथी, गे, लेस्बियन, बायोसेक्शुअल व इतर या वर्गात मोडणाऱ्या नागरिकांसाठी काम करणाऱ्या सारथी ट्रस्ट व समाजकल्याण विभागाच्या वतीने सीताबर्डी येथील लता मंगेशकर हॉस्पीटल परिसरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले .

LGBT; Now 'they' are members of the society and citizens of the country. | आता 'ते' समाजाचे घटक आणि देशाचे नागरिक आहेत..

आता 'ते' समाजाचे घटक आणि देशाचे नागरिक आहेत..

Next
ठळक मुद्देतृतीयपंथियांसह एलजीबीटी ग्रूपसाठी आधार, पॅन व रेशनकार्ड शिबिराचे विदर्भातील पहिले आयोजन अशा प्रकारचे शिबिर हे विदर्भातील पहिले आयोजन होते

 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: स्वत:चे नाव, पत्ता, वय, कुटुंबाची माहिती नोंदवलेला कागद हाती घेऊन बाहेर पडणाºया 'त्यांच्या' चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. हाती फार मोठी संपत्ती गवसल्याची ती जाण होती.. आपण खºया अर्थाने आता नागरिक झालो आहोत याची ती सार्थता होती... आणि आता पुढचे आयुष्य अधिक सन्मानाने जगण्याचा मार्ग खुला झाला याचा तो विश्वास होता... 
.. हे निमित्त होते, एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्ती व एलजीबीटी ग्रूपसाठी आयोजित केलेल्या महासामाजिक भागीदारी शिबिराचे. ज्यात आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, संजयगांधी निराधार योजना, तृतीयपंथी ओळखपत्र बनवणे व कौशल्य विकास प्रशिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला होता. अशा प्रकारचे शिबिर हे विदर्भात प्रथमच घेण्यात आले होते. 
तृतीयपंथी, गे, लेस्बियन, बायोसेक्शुअल व इतर या वर्गात मोडणाऱ्या नागरिकांसाठी काम करणाऱ्या सारथी ट्रस्ट व समाजकल्याण विभागाच्या वतीने सीताबर्डी येथील लता मंगेशकर हॉस्पीटल परिसरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले .
सहाय्यक आयुक्त रविंद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. 
या शिबिरात आतापर्यंत ३०० हून अधिक तृतीयपंथी व अन्य सदस्यांनी आपली आवश्यक असणारी ओळखपत्रे बनवली. 
जिथे प्रत्येक पावलावर व्यक्तीला आपली ओळख सिद्ध करावी लागते अशा या काळात या समुदायाकडे स्वत:ची कोणतीच अधिकृत ओळख पटवायला कोणताही शासकीय दस्तावेज नव्हता. कोरोनाकाळात लसीकरण करायचे झाले तरी आधारकार्डाची गरज पडत होती. या समुदायाची ही महत्त्वाची गरज लक्षात घेता, सारथी ट्रस्ट व समाजकल्याण विभागाच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.  
या शिबिराची माहिती तृतीयपंथियांना मिळावी या हेतूने शहरातील तृतीयपंथियांच्या पाच घराण्यांमध्ये त्याची सूचना देण्यात आली असल्याची माहिती विद्या कांबळे यांनी दिली. 
शिबिरात सहभागी झालेले शासकीय अधिकारी व कर्मचारीवृंद यांच्यासाठीही हा एक अनोखा अनुभव ठरला. 


आधारकार्ड  बनविण्यासाठी आईवडिलांचे नाव लागते. तृतीयपंथीय हे त्यांच्या घराण्यांवरून ओळखले जातात. शिबिरात त्या अर्जावर आईवडिलांच्या नावाऐवजी या घराण्यांची नावे लिहिण्यात आली अशी माहिती याठिकाणी असलेले अधिकारी अश्फाक बेग यांनी दिली. 


पत्ता नीट नसणे, अन्य कागदपत्रे नसणे या बाबींमुळे आधार व पॅनकार्डसारख्या गोष्टी बनवायला अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी येथे विशेषत्वाने अ‍ॅड्रेस प्रूफ सर्टिफिकेशनची सोय करण्यात आली होती. त्यासाठी नायब तहसीलदार तेथे नियुक्त करण्यात येऊन संबंधित प्रमाणपत्र तात्काळ दिले जात होते. 


तृतीयपंथीय व समलैंगिक व्यक्तींचे प्रतिनिधीत्व सरकारदरबारी असण्याची गरज येथे व्यक्त करण्यात आली. त्याकरिता लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी एक जागा राखीव असावी अशी मागणी काही जणांनी व्यक्त केली.

शिबिरात निकुंज जोशी, विद्या कांबळे, आनंद चांदरानी, आंचल शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: LGBT; Now 'they' are members of the society and citizens of the country.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.