गणेशोत्सव घरीच साजरा करूया! आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 08:06 PM2020-07-28T20:06:35+5:302020-07-28T20:14:34+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोविडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता गणेश मंडळांनीही या संकटाचा एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी आपण सर्व गणेशोत्सव घरीच साजरा करूया, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Let's celebrate Ganeshotsav at home! | गणेशोत्सव घरीच साजरा करूया! आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

गणेशोत्सव घरीच साजरा करूया! आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

Next
ठळक मुद्दे गणेशोत्सव मंडळांसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोविडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता गणेश मंडळांनीही या संकटाचा एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी आपण सर्व गणेशोत्सव घरीच साजरा करूया, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याचे शहरात पालन व्हावे, यासंदर्भात आयुक्तांनी शहरातील काही गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी मंगळवारी संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, प्रभारी उपायुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त, साहस गणेशोत्सव मंडळ प्रतापनगरचे गोपाल बोहरे, श्री बालमित्र गणेशोत्सव मंडळ छापरूनगरचे आकाश राजनानी, श्री तरुण बालमित्र गणेशोत्सव मंडळ मच्छीसाथचे विनोद लारोकर, दक्षिणामूर्ती गणेशोत्सव मंडळ महालचे अक्षय चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
२२ ऑगस्टला गणेश चतुर्थी असून दीड ते दहा दिवसाच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र या उत्सवात सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळले जाईल, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव टाळावे. शासन दिशानिर्देशानुसार घरगुती गणपती मूर्तीची उंची दोन फुटापर्यंत तर सार्वजनिक गणपतीची उंची चार फुटापर्यंतच असावी. मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे. यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवरी मूर्तीचेच पूजन करावे. हे शक्य नसेल आणि मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असेल तर तिचे विसर्जन शक्यतो घरच्याघरीच करावे. घरी विसर्जन अशक्य असेल तर कृत्रिम तलावातच करण्यात यावे. विसर्जनाची मिरवणूक न काढता आणि विसर्जनस्थळी कोणतीही आरती न घेता कमीतकमी वेळात घरी पोहचावे. शासनाच्या या निर्देशाचे पालन होईल याची सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले.

प्रतिबंधात्मक उपाययोजनाची जनजागृती करा
गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम न करता रक्तदान शिबिर, कोरोना, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांसाठी असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती करावी. गणपती मंडपाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. दर्शन घ्यायला येणाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंगचे, स्वच्छतेचे नियम पाळण्याची अट घालावी. शासन नियमांची जनजागृती करून सर्व गणेश मंडळांनी स्वत:सह इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असे तुकाराम मुंढे यांनी आवाहन केले.

Web Title: Let's celebrate Ganeshotsav at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.