शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

युरोपियन युनियनकडून घेणार शहर विकासाचे धडे

By admin | Updated: March 1, 2016 02:42 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी नागपूर शहराची निवड करण्यात आलेली नाही. परंतु विदेशात या शहराचे महत्त्व वाढत आहे.

महापालिकेशी इक्वी सिटी प्रकल्पाचा करार : ३.७५ कोटींचा खर्च करणारनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी नागपूर शहराची निवड करण्यात आलेली नाही. परंतु विदेशात या शहराचे महत्त्व वाढत आहे. यातूनच शहर विकासात भागीदार होण्यासाठी हात पुढे करीत युरोपियन युनियनने नगरसेवक व अधिकारी आणि सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना शहर विकासाचे धडे देण्याची तयारी दर्शविली आहे. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने इक्वी सिटी प्रकल्पांतर्गत महापालिका व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (एआयआयएलएसजी) यांच्यात १८ फेब्रुवारी २०१६ रोजी याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. कंपनीसोबत दोन वर्षांचा करार करण्यात आला आहे. यात विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन, समान नागरी सुविधांसाठी करावयाच्या उपाययोजना यांची माहिती दिली जाणार आहे. नागरी सुविधात गुणात्मक सुधारणा व्हावी यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने हा करार करण्यात आला आहे. या करारामुळे महापालिकेवर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक बोजा वाढणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)घनकचरा व्यवस्थापनासाठी ३३९ कोटींची गरजशहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. यासाठी ३३९ कोटींची गरज आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी हा अहवाल आवश्यक होता. स्वच्छ महाराष्ट्र मिशनमध्ये अशा आशयाचा आराखडा सादर करणे आवश्यक आहे. मे. आर.जगताप अ‍ॅन्ड असोसिएटस् यांनी हा अहवाल तयार केला आहे. समितीने याला मंजुरी दिली. ४० कोटींच्या सिमेंट रस्त्यांना मंजुरीशहरात ३२० कोटींच्या सिमेंट रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील दुसऱ्या टप्प्यात ४० कोटींच्या वेगवेगळ्या तीन निविदा मंजूर करण्यात आल्या, तर दोन निविदा तांत्रिक कारणामुळे प्रशासनाकडे परत पाठविण्यात आल्या आहेत. पुढील बैठकीत याला मंजुरी देण्यात येईल. या वर्षात सहा टप्प्यांची निविदा काढण्यात आली होती.