शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

त्या बिबट्याला जंगलात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:58 PM

हिंगणा तालुक्यातील डिगडोह (देवी) येथील पोलीसनगरात राहणाऱ्या पराग बायस्कर यांच्या घराच्या ‘बाथरूम’मध्ये शिरलेल्या बिबट्याला रविवारी सायंकाळी जेरबंद करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो सुदृढ असल्याचे स्पष्ट होताच त्याला सोमवारी दुपारी हिंगणा वनपरिक्षेत्रातील जंगलात सोडले.

ठळक मुद्देरात्रभर ‘ट्रॉन्झिट ट्रीटमेंट सेंटर’मध्ये मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर :  हिंगणा तालुक्यातील डिगडोह (देवी) येथील पोलीसनगरात राहणाऱ्या पराग बायस्कर यांच्या घराच्या ‘बाथरूम’मध्ये शिरलेल्या बिबट्याला रविवारी सायंकाळी जेरबंद करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो सुदृढ असल्याचे स्पष्ट होताच त्याला सोमवारी दुपारी हिंगणा वनपरिक्षेत्रातील जंगलात सोडले.हा बिबट रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पराग बायस्कर यांच्या ‘बाथरूम’मध्ये शिरला होता. ‘रेस्क्यू’ पथकाने त्याला सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास मोठ्या शिताफीने जेरबंद केले. त्यानंतर त्याला रात्रभर वन विभागाच्या सेमिनरी हिल्स, नागपूर येथील ‘ट्रॉन्झिट ट्रीटमेंट सेंटर’मध्ये ठेवण्यात आले. तिथे त्याच्यावर डॉ. गौतम भोजने व डॉ. व्ही. एम. धुत यांनी औषधोपचार करून रात्री ९ वाजता खायला देण्यात आले. तपासणीदरम्यान त्याच्या शरीरावर कुठेही जखमा आढळून आल्या नाहीत. त्यानंतर सोमवारी दुपारी त्याला हिंगणा वनपरिक्षेत्रातील जंगलात सुखरूप सोडण्यात आले, अशी माहिती हिंगण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांनी दिली.

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल