लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात उपचार घेत असलेल्या बिबट्याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दुपारी त्याचे शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा बिबट २२ जून रोजी मोरगाव (गोंदिया) वनक्षेत्रातील बोदरा आरक्षित जंगलात तिकडा ते सोनेगाव रस्त्यावर अस्वस्थ अवस्थेत मिळाला होता. दोन्ही पाय निकामी झाले होते. गोंदियात झालेल्या उपचारात बिबट किडनीच्या आजाराने ग्रस्त असल्याचे समजले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या निर्देशानुसार त्याला नागपूरच्या गोरेवाडा बचाव केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. रविवारी रात्री त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. सोमवारी सकाळी ११.३० वाजता मृत्यू झाला. दुपारी विभागीय प्रबंधक नंदकिशोर काळे, डॉ. शिरीष उपाध्ये, एसीएफ एच.व्ही. मारभृषी यांच्या उपस्थितीत डॉ. मयूर पावशे, डॉ. सुजित कोलगंथ, डॉ. भाग्यश्री भदाने यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.
नागपुरात किडनीच्या आजाराने बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 22:00 IST