शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

‘लिओनार्दाे दा विंची’चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: July 16, 2016 03:12 IST

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने जगप्रसिद्ध चित्रकार ‘लिओनार्दो दा विंची’ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे शुक्रवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते.

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे आयोजन : छापखाना व कलाश्रय ग्रुप यांचा संयुक्त उपक्रम नागपूर : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने जगप्रसिद्ध चित्रकार ‘लिओनार्दो दा विंची’ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे शुक्रवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. छापखाना ग्रुप व कलाश्रय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चित्रपटाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषत: मोठ्या संख्येत चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत दाखविण्यात आलेल्या या चित्रपटातून ‘लिओनार्दो दा विंची’ यांची महान चित्रकारिता, मूर्तिकारिता, वास्तुशिल्पकारिता, संगीतकारिता, कुशल यांत्रिककारिता, अभियंता व वैज्ञानिकता यावर प्रकाश टाकण्यात आला. अष्टपैलूत्वाचे धनी असलेले लिओनार्दो दा विंची यांचा जन्म इटली येथे १४५२ मध्ये तर मृत्यू १५१९ साली झाला. ते लहानपणी डिस्लेक्सिया आजाराने पीडित होते. यामुळे अक्षरओळख करण्यात अडचण येत होती. त्यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चित्र हे माध्यम बनविले. त्यांना जे काही समजत होते ते चित्रातून व्यक्त करीत होते. चित्रांशी मैत्री करीत पुढे ते एक महान चित्रकार झाले. लिओनार्दो दा विंची हे केवळ चित्रकारच नव्हते तर ते वैज्ञानिक, अभियंता, मूर्तिकार, संगीतकार, गणिततज्ज्ञ, खगोलजीवतज्ज्ञही होते. त्यांनी अनेक कलाकृतींसोबतच ‘मोनालिसा’ व ‘द लास्ट सपर’ या महान कलाकृती तयार केलेल्या आहेत. या चित्रपटाचा आस्वाद घेण्यासाठी माजी आमदार दीनानाथ पडोळे, वसंत चव्हाण, प्रसिद्ध चित्रकार रघु नेवरे, प्रा. सदानंद चौधरी, मिलिंद लिंबेकर, प्रकाश बेतावार, सुभाष तुलसीता यांच्यासह छापखाना ग्रुपचे कलावंत शेखर तांडेकर, मौक्तिक काटे, आनंद डबली, अभिषेक चौरसिया, महेश मानकर, शरद पवार चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी व कलाप्रेमी उपस्थित होते. कलेला प्रोत्साहन देणाऱ्या यासारख्या उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येईल, अशी माहिती जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे संयोजक अमित गोनाडे यांनी दिली. (प्रतिनिधी)