शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

लांजेवार-हजारे वाद भडकला

By admin | Updated: July 31, 2014 01:09 IST

गेल्या अडीच महिन्यांपासून धुमसत असलेला लांजेवार - हजारे वाद आज पुन्हा भडकला. पुरुषोत्तम हजारेच्या गुंडांनी आज जगदीश लांजेवारवर तीन गोळ्या झाडल्या. नंतर चाकू, तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पारडीत गोळीबार : प्रचंड तणाव नागपूर : गेल्या अडीच महिन्यांपासून धुमसत असलेला लांजेवार - हजारे वाद आज पुन्हा भडकला. पुरुषोत्तम हजारेच्या गुंडांनी आज जगदीश लांजेवारवर तीन गोळ्या झाडल्या. नंतर चाकू, तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नशीब बलवत्तर म्हणून लांजेवार बचावला. या घटनेमुळे पारडी कळमन्यात आज रात्री प्रचंड तणाव निर्माण झाला होता.लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिवसांपासून लांजेवार हजारे यांच्यातील वाद अधिकच तीव्र झाला. एकमेकांवर सशस्त्र हल्ला करणे, जमाव घेऊन चालून जाणे, पोलिसांकडे परस्पर विरोधात तक्रारी नोंदवणे, असे प्रकार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर,आज रात्री ७ च्या सुमारास जगदीश लांजेवार आपल्या पारडीतील घराजवळ त्याच्या चुलत भावासोबत गप्पा करीत होता. तेवढ्यात तीन मोटरसायकलीवर नऊ हल्लेखोर आले. त्यांनी देशी कट्ट्यातून लांजेवारवर तीन गोळ्या झाडल्या. लांजेवारने नेम चुकवून जीव वाचवला आणि आपल्या घरात पळून गेला. त्याच्या पाठोपाठ चाकू आणि तलवारी घेऊन आरोपीही आले. दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकून लांजेवारचे नातेवाईक, समर्थक मोठ्या प्रमाणात आरोपींच्या मागे धावले. त्यामुळे आरोपी पळून गेले. या घटनेनंतर पारडी-कळमन्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती कळताच कळमन्याचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धडकले. त्यांनी घटनास्थळावरून पिस्तुलाच्या गोळीची एक रिकामी पुंगळी ताब्यात घेतली. आरोपींच्या शोधासाठी सर्वत्र पोलीस पथक रवाना करण्यात आले. काही वेळेतच हेमंत यादव नामक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, लांजेवारवर हल्ला झाल्याचे वृत्त कळताच भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत कळमना पोलीस ठाण्यावर धडकले. आमदार कृष्णा खोपडे, भाजयुमोचे बंटी कुकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजारे गटाविरोधात नारेबाजी करू लागले. परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळताच अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे, डीसीपी संजय दराडे, एसीपी कुमरे यांनी घटनास्थळी आणि नंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन जमावाची समजूत काढली. लांजेवारच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. लांजेवारने देगू, गोलू आणि नंदू अशी तिघांची नावे सांगितली. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)२४ तासात दुसरा गोळीबारगुन्हेगारांच्या वैमनस्यातून उपराजधानीत २४ तासात झालेला हा दुसरा गोळीबार आहे. मंगळवारी रात्री गिट्टीखदानमधील समाधाननगरात कुख्यात आनंद शुक्ला या गुंडावर दुसऱ्या टोळीचे कुख्यात गुंड जेन्युअल, मोगल आणि पिन्नू पांडे यांनी गोळीबार केला होता. नेम चुकल्यामुळे तो बचावला. या प्रकरणातील आरोपी फरार असून, गोळीबाराचे वृत्त ताजेच असताना आज रात्री पुन्हा कळमन्यातील गुन्हेगारांची एक टोळी दुसऱ्याच्या जीवावर उठली. २४ तासाच गोळीबाराच्या दोन घटना घडल्यामुळे पोलीसही हबकले आहेत. दुसरीकडे लांजेवार आणि हजारे गटांना भक्कम राजकीय पाठबळ असल्यामुळेही पोलीस दडपणात आले आहेत.