शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कळमना बाजारात शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 17:08 IST

ढगाळ वातावरणामुळे नुकसानीची भीती : कुठलीही सुरक्षा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले धान दोन पैसे मिळावेत म्हणून कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणले आहे. हजारो पोत्यांमध्ये भरलेले लाखो क्विंटल धानसाठा मार्केटमध्ये उघड्यावर पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. येत्या ५ डिसेंबरपर्यंत परिस्थिती कायम राहणार आहे. अशात अवकाळी पाऊस झाल्यास मोठे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

नागपूर व भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आपला माल विकण्यासाठी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणतात. दलालाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना धान विकले जाते. कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांचे वर्चस्व आहे. दलाल आपल्या फायद्यासाठी शेतमालाच्या किमती पाडतो. त्यामुळे शेतकरी अपेक्षित भाव मिळावा म्हणून माल बाजार समितीतच पुढे काही दिवस ठेवतो. सध्या कळमना बाजारात धानाची आवक सुरू झाली आहे. किमान १० हजारांवर धानाची पोती सध्या बाजारात उघड्यावर आहे. दक्षिण भारतात जोरदार पाऊस सुरू आहे, तर हवामान खात्याने नागपुरात ५ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तविला आहे. फंगल हे चक्रीवादळ अरबी समुद्राकडे सरकल्यास ढगाळ वातावरण आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.

गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याचा अंदाज नागपुरात नसला तरी सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पावसाची भीती आहे. तीन वर्षांपूर्वी याच सिजनमध्ये अवकाळी पाऊस झाला होता आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले होते. सध्या कळमन्याच्या पार्किंग एरियामध्ये धान साठविले जात आहे आणि ते उघड्यावर आहे. 

"एवढा मोठा शेतमाल शेतकरी आणत असताना त्यांच्या मालाच्या सुरक्षेची जबाबदारी समितीची आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आल्या होत्या; परंतु त्या आता शेतकयांच्या पिळवणुकीचे अड्डे झालेल्या आहेत, असेच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांच्या भरवशावर दलालांच्या संपत्तीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांसाठी सुविधा न पुरविल्याने त्यांनी घाम गाळून पिकविलेले अन्न कवडीमोल ठरत आहे."- संजय सत्यकार, शेतकरी

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डnagpurनागपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र