नागपुरातील तीन आरामशीनचे आगीत लाखोचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 21:39 IST2021-04-27T21:33:47+5:302021-04-27T21:39:39+5:30
saw mills fire भंडारा रोडवरील कापसी खुर्द परिसरातील तीन आरामशीनला सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले.

नागपुरातील तीन आरामशीनचे आगीत लाखोचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा रोडवरील कापसी खुर्द परिसरातील तीन आरामशीनला सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले.
प्लॉट क्रमांक ६१ येथील मे. पोपटलाल पटेल, मे. प्रदीप पटेल व जलाराम इंडस्ट्रीज परिसरात ही आग लागली. माहिती मिळताच मनपा अग्निशमन विभागाच्या लकडगंज, कळमना, गंजीपेठ, सक्करदरा, कॉटन मार्केट, सिव्हिल लार्ईन व त्रिमूर्तिनगर फायर सब-स्टेशनच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहचल्या. अग्निशमन अधिकारी मोहन गुडधे व तुषार बाराहाते यांच्या नेतृत्वात जवानांनी दोन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपटलाल पटेल, मे. प्रदीप पटेल व जलाराम इंडस्ट्रीज यांच्या आरामशीन येथील लाकूड, मोटर, वायरिंग व मशीनचे आगीमुळे लाखोचे नुकसान झाले आहे.