नागपुरात इमारतीवरून पडून मजुराचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 20:19 IST2018-10-13T20:18:11+5:302018-10-13T20:19:05+5:30

सुरक्षेची आवश्यक ती साधने उपलब्ध नसल्याने एका इमारतीवरून खाली पडून तरुण मजुराचा करुण अंत झाला. जरीपटक्यातील कमलफुल चौकाजवळ शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

A labor dead collapse from building in Nagpur | नागपुरात इमारतीवरून पडून मजुराचा करुण अंत

नागपुरात इमारतीवरून पडून मजुराचा करुण अंत

ठळक मुद्देउंच धोक्याच्या ठिकाणी काम करताना घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुरक्षेची आवश्यक ती साधने उपलब्ध नसल्याने एका इमारतीवरून खाली पडून तरुण मजुराचा करुण अंत झाला. जरीपटक्यातील कमलफुल चौकाजवळ शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. ग्रेस प्रकाश करवाडे (वय २६) असे मृताचे नाव आहे. तो कबिरनगरात राहत होता.
कमलफुल चौकाजवळ मुकेश बोधाणीच्या घराचे बांधकाम सुरू आहे. येथे ग्रेस करवाडे कामावर होता. उंच धोक्याच्या ठिकाणी काम करताना अचानक त्याचे संतुलन बिघडल्याने तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला प्रारंभी जनता हॉस्पिटल आणि नंतर एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे दुपारी ३ च्या सुमारास ग्रेसला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ग्रेसच्या कुटुंबीयांना ही माहिती कळताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तरुण मजुराचा करुण अंत झाल्याने अन्य मजुरांनाही जबर मानसिक धक्का बसला. ग्रेसचे वडील प्रकाश प्रेमलाल करवाडे (वय ५४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. ग्रेसच्या मृत्यूला कुणाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.

 

Web Title: A labor dead collapse from building in Nagpur