शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

केव्हीआयसीच्या अधिकाऱ्यास कारावास

By admin | Updated: July 11, 2014 01:16 IST

नागपूर रेल्वेस्थानकावरील आठ हजाराच्या लाचप्रकरणी सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. एस. मुरकुटे यांच्या न्यायालयाने खादी व ग्रामोद्योग आयोगाचे सहायक विकास अधिकारी

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरील आठ हजाराच्या लाचप्रकरणी सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. एस. मुरकुटे यांच्या न्यायालयाने खादी व ग्रामोद्योग आयोगाचे सहायक विकास अधिकारी प्रकाश विठ्ठलराव चौदलवार यांना तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सीबीआयच्या पथकाने सापळा रचून १३ फेब्रुवारी २००८ रोजी नागपूर रेल्वेस्थानकावर भंडाऱ्याच्या तिरोडा येथे राहणाऱ्या या अधिकाऱ्याला लाखनी येथील रहिवासी डॉ. दीपराज इलमकर यांच्याकडून आठ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. या सापळ्याची पार्श्वभूमी अशी की, केंद्र सरकारने २००७ मध्ये खादी व ग्रामोद्योग आयोग संचालनालयाच्या अंतर्गत ‘ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम’ ही योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत इलमकर यांना लाखनी येथे राईस मिल उभारायची होती. या योजनेंतर्गत सरकार २५ लाखांच्या प्रकल्पापर्यंत बँक आॅफ इंडियाच्यामार्फत कर्ज मंजूर करीत होती. एकूण प्रकल्प खर्चात ९५ टक्के अर्थसाहाय्याचावाटा बँकेचा तर ५ टक्के वाटा खुद्द प्रकल्पधारकाचा होता. लाभार्थ्याला ४ लाख ५० हजाराचे अनुदान खादी व ग्रामोद्योग आयोग देत होते. यानुसार इलमकर यांनी या आयोगाच्या नागपूर येथील कार्यालयात अर्ज केला होता. परंतु येथील अधिकारी त्यांना कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे त्यांनी लाखनी शाखेच्या बँक आॅफ इंडियात अर्ज केला होता. बँकेने याबाबत आयोगाकडे विचारणा केली होती. उपसंचालकाने अटींची पूर्तता केल्यास स्वयंरोजगारासाठी असे कर्ज देता येते, असे कळवले होते. या कामासाठी उपसंचालक हेडाऊ यांना नेमण्यात आले होते. प्रकाश चौदलवार यांना इलमकर यांच्या प्रकल्पाचे निरीक्षण करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी ३ फेब्रुवारी २००८ रोजी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट दिली होती. निरीक्षण केल्यानंतर त्यांनी अनुदानासाठी नऊ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. पुढे सौदेबाजी होऊन आठ हजार रुपये देण्याचे ठरले होते. परंतु डॉ. इलमकर यांना लाच द्यायची नसल्याने, त्यांनी सीबीआयकडे तक्रार नोंदवली होती. लाच नागपूर रेल्वेस्थानकावर देण्याचे ठरले होते. सापळ्याच्या दिवशी चौदलवार हे गोंदियाहून गीतांजली एक्स्प्रेसने आले होते. इलमकर यांनी दिलेली आठ हजाराची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात अटक करण्यात आली होती. सीबीआयने तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. लाचेचा सापळा सिद्ध होताच, न्यायालयाने आरोपी चौदलवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत तीन वर्षे कारावास, दोन हजार रुपये दंड, कलम १३ (२), १३ (१)(ड)अंतर्गत दोन वर्षे कारावास, एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील अग्रवाल तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. शेंडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)