शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या घावाचा खटला २० वर्षे चालला

By admin | Updated: June 29, 2014 01:13 IST

वाद किरकोळ होता, पण आरोपीने रागावर नियंत्रण ठेवले नाही. समोरच्या व्यक्तीला चाकूचे घाव घालून गंभीर जखमी केले. एका चुकीचे ओझे त्याला २० वर्षे वाहावे लागले. फिर्यादीने मोठ्या मनाने तडजोडीस

लोक न्यायालय : ८५२ प्रलंबित प्रकरणे निकालीनागपूर : वाद किरकोळ होता, पण आरोपीने रागावर नियंत्रण ठेवले नाही. समोरच्या व्यक्तीला चाकूचे घाव घालून गंभीर जखमी केले. एका चुकीचे ओझे त्याला २० वर्षे वाहावे लागले. फिर्यादीने मोठ्या मनाने तडजोडीस मान्यता दिल्यामुळे हे प्रकरण आज, शनिवारी लोक न्यायालयात निकाली निघाले.एस. के. सलीम असे आरोपीचे नाव असून तो मोमीनपुरा येथील रहिवासी आहे. मुस्ताक अली फिर्यादी आहे. त्याच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी सलीमविरुद्ध भादंविच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला होता. ही घटना १९९४ मधील आहे. तपासानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला २० वर्षे चालला. नियमित प्रक्रियेंतर्गत प्रकरणावर निर्णय होण्यासाठी आणखी वेळ लागला असता. परंतु, लोक न्यायालयात न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या पॅनलने दोन्ही पक्षांच्या सहमतीने खटला संपविला.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे जिल्हा न्यायालयात आयोजित या लोक न्यायालयात १२३५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८५२ प्रकरणे निकाली निघाली. प्रकरणे ऐकण्यासाठी ८ पॅनल तयार करण्यात आले होते. प्रत्येक पॅनलवर न्यायाधीश, वकील व सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश होता. दुसरे एक जुने प्रकरण १९९८ मधील होते. यात आरोपी शेखर मुर्खेने फिर्यादी मालाबाई गार्गेला डोक्यावर लोखंडी पाईप मारून जखमी केले होते. कोराडी येथील प्रकरणात गहाण ठेवलेल्या सोन्याची आरोपींनी परस्पर विल्हेवाट लावली होती. फिर्यादी अर्चना टेकाडेने ३ लाख रुपये कर्जाच्या मोबदल्यात सोने ठेवले होते. सरिता गायकवाड व मुकुंद गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. हा वाद आपसी तडजोडीने निकाली निघाला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. के. सोनवणे व प्राधिकरणचे सचिव किशोर जयस्वाल यांच्या नेतृत्वात लोक न्यायालय यशस्वीतेत पार पडले.(प्रतिनिधी)