नागपूरनजीक कन्हान येथे पोलिसावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:09 IST2020-09-17T01:07:11+5:302020-09-17T01:09:14+5:30

कन्हान पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस हवालदारावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास कन्हानच्या तारसा रोड येथील गहू हिवरा चौकात ही घटना घडली.

Knife attack on police at Kanhan near Nagpur | नागपूरनजीक कन्हान येथे पोलिसावर चाकू हल्ला

नागपूरनजीक कन्हान येथे पोलिसावर चाकू हल्ला

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर (कन्हान) : कन्हान पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस हवालदारावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास कन्हानच्या तारसा रोड येथील गहू हिवरा चौकात ही घटना घडली. रवी चौधरी (४३) रा. खसाळा ता.कामठी असे जखमी पोलीस शिपायाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कन्हान पोलिसांनी मंगळवारी रात्री सिहोरा घाट येथे रेती उत्खनन करणारे काही वाहन जप्त केले होते. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या वाहनाचाही समावेश होता. त्या व्यक्तीच्या भावाला पोलिसांनी रात्रीच अटक केली होती. या घटनेचा वचपा काढण्यासाठी आरोपीकडून पोलीस हवालदारावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात पोलीस हवालदाराच्या पोटाला आणि पायाला गंभीर जखम झाली आहे. त्याला उपचारासाठी आधी कामठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथे हलविण्यात आले.

Web Title: Knife attack on police at Kanhan near Nagpur