जुन्या वादातून चाकूहल्ला, रोहित शर्मावर गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Updated: May 9, 2024 15:43 IST2024-05-09T15:42:22+5:302024-05-09T15:43:04+5:30
Nagpur : जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला करणाऱ्या रोहित शर्मा नावाच्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Knife attack due to old dispute, case filed against Rohit Sharma
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला करणाऱ्या रोहित शर्मा नावाच्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
शिवा प्रमोद बोदिले (१८, गोधनी, रेल्वे झोपडपट्टी) असे तक्रारदाराचे नाव आहे. तो खासगी काम करतो. त्याचा रोहित शर्मा (२२, गोधनी) नावाच्या तरुणासोबत वाद झाला होता. त्यानंतर रोहित त्याच्या घराजवळ त्याची विचारपूस करीत आला होता. मात्र शिवा भेटला नव्हता. २६ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता शिवा कामावरून परत येत असताना नागमंदिराजवळ रोहितने त्याला अडवले. जुन्या वादावरून त्याने शिवीगाळ सुरू केली. त्याने शिवाला मारहाण सुरू करत त्याच्यावर चाकूने वार केले. यात शिवा जखमी झाला. त्याने आरडाओरड केल्याने रोहित फरार झाला. त्याचा मित्र शिवाला मेयो इस्पितळात घेऊन गेला. तेथून त्याला मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले. दोन दिवसांअगोदर त्याला दवाखान्यातून सुटी मिळाली. त्याच्या तक्रारीवरून आरोपी रोहितविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.