शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रक्कम परत मागितली म्हणून चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST

नागपूर : उधार दिलेले ५० हजार रुपये परत मागणाऱ्यावर आरोपींनी कोयत्याने हल्ला चढवून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. शनिवारी ...

नागपूर : उधार दिलेले ५० हजार रुपये परत मागणाऱ्यावर आरोपींनी कोयत्याने हल्ला चढवून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. शनिवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेने पाचपावलीच्या लाल दरवाजा परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.

गुलशन कवडूजी बोकडे (वय २६) असे जखमीचे नाव असून तो यशोधरानगरातील धम्मदीपनगरात राहतो. गुलशनने काही दिवसांपूर्वी ऋषभ राधेशाम पैगवार (वय २४) याला ५० हजार रुपये उधार दिले होते. ते परत करण्यासाठी आरोपी टाळाटाळ करीत होता. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री गुलशन त्याच्या मित्रासह आरोपी पैगवार याच्या पिवळी मारबत चाैकाजवळच्या घरी गेला. पैसे परत मागताच आरोपी पैगवारने गुलशनला ‘नाही देत’, असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली. त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची सुरू असताना आरोपी पैगवारचे दोन भाऊ आले. त्यांनी गुलशनला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर आरोपी पैगवारने घरातून कोयता आणून गुलशनच्या पोटावर घाव घातला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपीच्या तावडीतून गुलशनला सोडवले. माहिती कळताच पाचपावली पोलीस पोहचले. जखमी गुलशनला मेयोत दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपींची चौकशी सुरू आहे.

कळमन्यातही प्राणघातक हल्ला

नागपूर : जुन्या वादातून दोन आरोपींनी विपीन दुर्गाप्रसाद शाहू (वय १८) याला चाकूने मारून गंभीर जखमी केले. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. राहुल बागडे (रा. लक्ष्मीनगर) तसेच शुभम काशीनाथ कदम (वय २४, रा. दत्तनगर) यांचा विपीनसोबत काही दिवसांपासून वाद होता. या वादातून ही घटना घडली. विपीनचा भाऊ अनिल दुर्गाप्रसाद शाहू (रा. शिवमंदिरजवळ कळमना) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी बागडे आणि कदमविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपी कदमला अटक करण्यात आली असून, बागडेचा शोध सुरू आहे.

------