नागपुरात चाकूहल्ला : मेव्हण्याला गंभीर जखमी केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 16:23 IST2018-07-04T16:22:04+5:302018-07-04T16:23:07+5:30
घरगुती कारणावरून एका आरोपीने त्याच्या मेव्हण्यावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. कुणाल दिलदार वालदे (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. तो जरीपटक्यात पोलीस चौकीजवळ राहतो. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.

नागपुरात चाकूहल्ला : मेव्हण्याला गंभीर जखमी केले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरगुती कारणावरून एका आरोपीने त्याच्या मेव्हण्यावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. कुणाल दिलदार वालदे (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. तो जरीपटक्यात पोलीस चौकीजवळ राहतो. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.
आरोपी सनी राजू रगडे (वय ३५, रा. सराफ चेंबरजवळ, सदर) आणि कुणाल वालदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू आहे. मंगळवारी रात्री हे दोघे आरोपी सनीच्या घराजवळ असलेल्या गपूची किडस्जवळ समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर आरोपी सनीने कुणालवर चाकूहल्ला केला. छातीवर घाव बसल्याने कुणाल गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात धावपळ निर्माण झाली. जखमी कुणालला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कुणालची आई अनिता दिलदार वालदे (वय ५४) यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सनी रगडेला अटक केली.
विशेष म्हणजे, पावसाळी अधिवेशनामुळे सदर परिसरात सोमवारी सायंकाळपासूनच प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला आहे. असे असतानाही येथे एका आरोपीने चाकूहल्ला करून एकाला जखमी केल्याची घटना पोलिसांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह लावणारी ठरली आहे.