किरण पांडव यांची शिवसेनेच्या पूर्व विदर्भ संघटक पदी नियुक्ती
By कमलेश वानखेडे | Updated: December 14, 2023 15:35 IST2023-12-14T15:34:31+5:302023-12-14T15:35:36+5:30
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची समजली जात आहे.

किरण पांडव यांची शिवसेनेच्या पूर्व विदर्भ संघटक पदी नियुक्ती
नागपूर : शिवसेनेच्या पूर्व विदर्भ संघटक पदी युवा नेते किरण पांडव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नागपूर येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात पांडव यांना नियुक्तीचे पत्र दिले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची समजली जात आहे.
ओबीसी चेहरा असलेले पांडव यांची अलीकडेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पूर्व विदर्भात शिंदे यांना ताकद देण्यात आणि पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पांडव महत्वाची भूमिका वठवित आहेत. पांडव यांच्या नियुक्ती बद्दल खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे पूर्व विदर्भातील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. पांडव यांनी यापूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर नागपूर जिल्ह्यातील काटोल व दक्षिण नागपूर मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. पूर्व विदर्भात शिवसेनेच्या संघटन वाढीसाठी पांडव यांनी आजवर महत्वाची भूमिका वठविली आहे.