फुटाळ्यात किंगफिशर :
By Admin | Updated: June 4, 2014 01:13 IST2014-06-04T01:13:00+5:302014-06-04T01:13:00+5:30
साधारणत: आफ्रिका आणि आशिया खंडात दिसणारा ‘पाईड किंगफिशर’ हा स्वच्छ तलाव असलेल्या पाण्यात मासे पकडतो. यालाच ‘सेराईल रडिस’ असे शास्त्रीय नाव आहे. मराठीत याला बंड्यापक्षी, कवड्या खंड्या

फुटाळ्यात किंगफिशर :
साधारणत: आफ्रिका आणि आशिया खंडात दिसणारा ‘पाईड किंगफिशर’ हा स्वच्छ तलाव असलेल्या पाण्यात मासे पकडतो. यालाच ‘सेराईल रडिस’ असे शास्त्रीय नाव आहे. मराठीत याला बंड्यापक्षी, कवड्या खंड्या किंवा कवड्या धीवर म्हणतात. हा पक्षी चक्क आज फुटाळा तलावावर मासेमारी करण्यासाठी आला तेव्हा पक्षिप्रेमींचे लक्ष त्याने वेधून घेतले. कदाचित फुटाळा तलावात स्वच्छ पाणी कुठे सापडेल, याचा अंदाज घेताना या पक्ष्याचे हे कुटुंब.