ढेकूण मारण्याच्या नादात गेला तरुणीचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:48 IST2018-01-22T19:43:14+5:302018-01-22T19:48:55+5:30
घरातील ढेकूण नष्ट करण्यासाठी वापरलेल्या औषधाची विषबाधा झाल्याने एका तरुणीचा जीव गेला.

ढेकूण मारण्याच्या नादात गेला तरुणीचा जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरातील ढेकूण नष्ट करण्यासाठी वापरलेल्या औषधाची विषबाधा झाल्याने एका तरुणीचा जीव गेला. रवीना धनलाल जगणे (वय २१) असे मृत तरुणीचे नाव आहे.
रवीना ही वसंतराव नाईक झोपडपट्टीत राहत होती. घरात फार ढेकूण (खटमल) झाल्यामुळे तिने ७ जानेवारीला घराला सफेदी मारण्याचे काम सुरू केले. या रंगात तिने ढेकूण मारण्याचे औषध मिसळवले. सफेदी मारताना रंग भरलेला हात नाकातोंडाला लागल्याने तिची प्रकृती बिघडली. तिला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी रवीनाने प्राण सोडले. धनलाल शिवा जगणे (वय ५१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.