शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमधील युवतीचे अपहरण करणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कोलकाता (पश्चिम बंगाल) मधील एका स्टील कंपनीच्या मालकाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कोलकाता (पश्चिम बंगाल) मधील एका स्टील कंपनीच्या मालकाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला नागपुरात घेऊन येणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) जेरबंद केले. रहमत कलाम शेख (वय २७), असे त्याचे नाव असून, तो २४ परगना जिल्ह्यातील गोलाबराई महेशपूर (मागराहाट) येथील रहिवासी आहे.

विवाहित असलेला रहमत शेख मागराहाट येथील एका स्टील कंपनीत काम करायचा. कंपनी मालकाच्या १६ वर्षीय मुलीला प्रेमजाळ्यात ओढून त्याने ६ मार्चला तिचे अपहरण केले. मागराहाट पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असता तो युवतीसह नागपुरात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे परगना पोलिसांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला. आयुक्तांनी लगेच आरोपी, तसेच अपहृत मुलीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार एसएसबीच्या पथकाने यशोधरानगरातील एका रेडिमेड कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या रहमत शेखला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून शनिवारी दुपारी अपहृत युवतीला सीताबर्डीच्या मोदी नंबर ३ मध्ये (आनंदनगर) ताब्यात घेतले. ही माहिती परगना पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार, तेथील पोलीस पथक नागपुरात पोहोचले. आरोपी आणि पीडित युवतीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

----

तो तीन मुलांचा बाप, ती दहावीची विद्यार्थिनी

आरोपी रहमत शेख हा तीन मुलांचा बाप असून, त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवून पळवून आणलेली युवती दहावीची विद्यार्थिनी असल्याचे समजते. त्याने नागपुरात तिच्यासोबत शरीरसंबंधही प्रस्थापित केल्याचा संशय असून, वैद्यकीय तपासणीत त्याला दुजोरा मिळाल्यास आरोपीवर बलात्काराचाही गुन्हा दाखल होऊ शकतो.

-----