शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

नशेसाठी मित्राचेच केले अपहरण, अंतर्वस्त्रातील व्हिडीओही काढत केले ब्लॅकमेल

By योगेश पांडे | Updated: October 14, 2024 18:56 IST

Nagpur : मारहाण करत जीवे मारण्याची दिली धमकी

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत नशेचे प्रमाण वाढत असून त्यातूनच अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. अशाच नशेखोर तरुणांकडून दारूच्या पैशांसाठी चक्क अल्पवयीन मित्राचेच अपहरण करण्यात आले. मित्राला निर्जन स्थळी नेत त्याचा अंतर्वस्त्रातील व्हिडीओ तयार करत त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा खळबळजनक प्रकार घडला.

संबंधित अल्पवयीन मुलगा नरेंद्रनगर परिसरात राहतो. १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तो कुटुंबियांसोबत नरेंद्रनगरातील लक्षवेध मैदानात गरबा पाहण्यासाठी गेला होता. त्याचे कुटुंबीय घरी परतले व अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्रांसोबतच तिथे थांबला होता. रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान त्याचे जुने मित्र हर्षल राजेश शाहू (१९, बाळकृष्णनगर), प्रयाग रविंद्र मेश्राम (१९, मुद्रानगर, मानेवाडा) व अल्पवयीन मुलगा यांनी त्याला बोलायचे आहे असे म्हणत एका कारजवळ नेले. एमएच ३१ सीपी ७८११ या क्रमांकाच्या कारमध्ये त्यांनी त्याला कोंबले व शंकरपूरजवळील पंडित हवेलीजवळ नेले. तेथे त्यांनी त्याला मारहाण केली व त्याच्या अंगावरील सगळे कपडे काढले. हर्षलने त्याचा अंतर्वस्त्रातील व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत नशा करण्यासाठी पाच हजार रुपये मागितले. त्यानंतर त्यांनी त्याला तिथेच ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलाने त्याच्याजवळील तीन हजार रुपये आरोपींना दिले. तसेच एका मित्राला फोन करून आरोपींच्या फोन पेच्या स्कॅनरवर दोन हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी अल्पवयीन मुलाला त्याच अवस्थेत नरेंद्रनगर येथील अग्निशमन विभागाच्या कार्यालयाजवळ सोडले. त्याने घरी जाऊन कुटुंबियांना या प्रकाराची माहिती दिली. त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी दोनही आरोपींना अटक केली तर आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या हवाली केले.

वडिलांनादेखील जीवे मारण्याची धमकीनरेंद्रनगरला आरोपींनी अल्पवयीन मुलाला परत सोडले. त्यावेळी जर पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली तर तुझ्यासोबतच वडिलांनादेखील जीवे मारू अशी आरोपींनी धमकी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी