शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपुरातील  खामल्यात बारमध्ये गुंडांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 8:47 PM

क्षुल्लक वादातून गुन्हेगारांनी एका बारमध्ये तोडफोड करून गोंधळ घातला. तलवार आणि चाकूच्या बळावर गुन्हेगारांनी एका तरुणाला घेरले. परंतु ऐनवेळी पोलीस आल्यामुळे तरुणाचा जीव वाचला.

ठळक मुद्देचाकूच्या धाकावर तरुणाला घेरले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : क्षुल्लक वादातून गुन्हेगारांनी एका बारमध्ये तोडफोड करून गोंधळ घातला. तलवार आणि चाकूच्या बळावर गुन्हेगारांनी एका तरुणाला घेरले. परंतु ऐनवेळी पोलीस आल्यामुळे तरुणाचा जीव वाचला.सिंधी कॉलनी येथील प्रकाश तोतवानी यांचा खामला रोडवर आर. के. बार आहे. मंगळवारी रात्री शिवनगर झोपडपट्टी येथील गुन्हेगार संदीप ऊर्फ गप्पू समुंद्रे आपल्या साथीदारांसह बारमध्ये आला होता. बारमध्ये बसलेल्या दुसऱ्या एका ग्राहकाशी त्याचा वाद झाला. यावरून समुंद्रेने बारमध्ये गोंधळ घातला. बारमधील कर्मचाऱ्यांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने काही ऐकले नाही. आपल्या १०-१२ साथीदारांसह तोडफोड करून तो फरार झाला. दरम्यान दोन तरुणांंनाही त्यांनी घेरले होते. त्यांना जीवे मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु त्याचवेळी पोलीस आल्याने समुंद्रे आपल्या साथीदारांसह पळाला. या घटनेमुळे खामला परिसरात तणाव निर्माण झाला आहे.समुंद्रे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची खामला परिसरात दहशत आहे. त्याचे बहुतांश साथीदार हे जुन्या खामला वस्तीतील असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मदतीनेच तो हल्ला करतो. तो व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली करतो. व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याने अनेक हल्ले केल्याचेही सांगितले जाते. प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर