शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

"त्या" विमानप्रवाशांना विलगीकरणात ठेवा, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 12:19 IST

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांनी बचावासाठी बूस्टर डोस घ्यावा, असं तज्ज्ञांनी म्हटलं.

चीनसह अनेक देशांत कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड टेस्ट सुरू आहे. परदेशातून येणाऱ्यांची कोविड चाचणी होणार आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं कोविड प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल. राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा समोर आल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. तसेच, नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.  

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांनी बचावासाठी बूस्टर डोस घ्यावा, असं तज्ज्ञांनी म्हटलं. आत्तापर्यंत कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत, परंतु प्रतिबंधात्मक उपायांवर जोरदार काम सुरू झाले आहे. ज्या लोकांना आधीच कोणताही आजार आहे किंवा वृद्ध आहेत त्यांनी विशेषतः त्याचे पालन करावे. आरोग्य मंत्रालय दर आठवड्याला कोविड संदर्भात आढावा बैठक घेणार आहे. राज्यातही या संदर्भात शासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. 

यासंदर्भात विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची थर्मल टेस्टींग घेण्याचे निर्देश विमानतळ अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यातच, चीनवरुन येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची थर्मल टेस्टींग करा आणि त्या टेस्टींगमध्ये काही डिफेक्ट वाटल्यास त्या प्रवाशांना आयसोलेशनमध्ये टाका, असे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. महाराष्ट्रातील लोकांची इम्युनिटी चांगली आहे, त्यामुळे कोरोना संदर्भातील वृत्त वाचून घाबरुन जायचं कारण नाही. प्रशासन, शासन आणि आपली यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे. मास्क बंधनकारक करायचा का नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

दरम्यान, तालुका पातळीपासून ते महानगर पालिकेतील सर्व आरोग्य यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर आरोग्य भरती करण्यावरही आमचा भर आहे, असंही त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTanaji Sawantतानाजी सावंतnagpurनागपूरairplaneविमानchinaचीन