शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पक्षाच्या विचारांचा झेंडा घेऊन पुढे चालत रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:14 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातील विनम्रतेचा परिचय रविवारी सुमतीताई सुकळीकर यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात आला. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या निर्मला चितळे यांचे गडकरींनी पाया पडून आशीर्वाद घेतले अन् तेव्हा अख्खे सभागृह भारावून गेले.

ठळक मुद्देसुमतीताई सुकळीकर स्मृतिदिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्ता ही क्षणभंगूर आहे. आज मिळणारा मान उद्या मिळणार नाही. त्यामुळे सत्तेचा मोह सोडून पक्षाच्या विचारांचा झेंडा घेऊन पुढे चालत रहा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले.भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरतर्फे सुमतीताई सुकळीकर स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन रविवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती मीरा खडक्कार होत्या. त्याचबरोबर माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृ ष्णा खोपडे, मोहन मते, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा कोठे, माजी महापौर अर्चना डेहनकर उपस्थित होते. यावेळी भाजपाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सुधा सोहनी यांचा सत्कार करण्यात आला. सुमतीतार्इंच्या कार्याबद्दल गडकरी म्हणाले, तार्इंचे जीवनकार्य मोठे आहे. जनसंघाच्या काळापासून सुमतीताई कार्य करीत होत्या. तेव्हा पक्षाला लोकसमर्थन नव्हते. विचारांना प्रतिष्ठा नव्हती, ब्राह्मणांची पार्टी म्हणून हिणवले जात होते. जातीयवादी, सांप्रदायिक, गांधीचा खून करणारे म्हणून अपमानित केले जात होते. तो काळ अतिशय प्रतिकूल होता. अशावेळी सुमतीताई सुकळीकर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केले. अपमान सहन करीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन पक्षाचा विचार समाजात रुजविला. भाजपाला आज जे यश मिळत आहे, ते तार्इंसारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी हा इतिहास महत्त्वाचा आहे. आपण भूतकाळ विसरलो तर उद्याचे उज्वल भविष्य लिहू शकणार नाही. सत्ता, यश यामागे न धावता भारतीय जनता पक्षाच्या विचारांना तळागळात पोहचविण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. तार्इंच्या कामाचे मूल्यमापनच होऊ शकत नसल्याचे खडक्कार म्हणाल्या.

भीती निर्माण करून व्होटबँकेचे राजकारण होत आहेसीएएच्या नावावर देशभरात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. मुस्लीम समाजाला भीती दाखवून व्होटबँक मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यामुळे पक्षाचा, संघटनेचा विचार तळागळापर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले.-वृत्त/८

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी